जगभरात प्रतिष्ठीत समजल्या जाणाºया कान्स फिल्म फेस्टीवलची धुम सध्या फ्रान्स मध्ये सुरु आहे. कान्स आंतरराष्ट्रीय ...
अमृताची कान्स भरारी
/> जगभरात प्रतिष्ठीत समजल्या जाणाºया कान्स फिल्म फेस्टीवलची धुम सध्या फ्रान्स मध्ये सुरु आहे. कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये आपलीही फिल्म दाखविण्यात यावी असे स्वप्न तर प्रत्येक कलाकार, दिग्दर्शकाचे असते. आपला मराठी सिनेमा ग्लोबल झाला अन तो सातासमुद्रापार पोहचला असे तर आपण कौतुकाने सांगत असतो. एवढेच नाही तर मराठीतील तारकाही आता बॉलीवुडमध्ये चमकु लागल्या आहेत थोडक्यात काय तर आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला सोन्याचे दिवस आले आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. कान्स मध्ये आदिनाथ कोठारे प्रोड्युसर वर्कशॉप अटेंड करण्यासाठी गेला आहे. तर आता आपली मराठी तारका अमृता सुभाष हिने देखील कान्स साठी भरारी घेतली आहे. अमृता अनुराग कश्यप यांच्या रमन राघव २.० या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करीत आहे. अमृताच्या जोडीला या चित्रपटात दर्जेदार अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी असणार आहेत या चित्रपटाची चर्चा होत असतानाच आता या सिनेमाची टिम कान्सला पोहचली असल्याचे समजते. डायरेक्टर्स फोर्टनाईट या विभागात कान्समध्ये हा चित्रपट दाखविला जाणार आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासमवेत अमृता तिच्या या चित्रपटासाठी कान्सला गेली आहे. कौतुकाची बाब म्हणजे स्मिता पाटील यांच्या नंतर कान्स मध्ये सहभागी होणारी अमृता ही दुसरी अभिनेत्री आहे. या आधी १९७६ साली स्मिता पाटील त्यांच्या निशांत या चित्रपटासाठी श्याम बेनेगल व शबाना आझमी यांच्या सोबत कान्स मध्ये हरज राहिल्या होत्या. तब्बल ४० वषार्नंतर एखादी मराठी अभिनेत्री कान्स च्या रेड कारपेटवर उतरते ही खरच मराठी इंडस्ट्रीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.