अमृता फडणवीस रॅम्व वॉकच्या माध्यमातून अ‍ॅसिड हल्ल्यावर मात करणाºयांना देणार आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 13:32 IST2017-02-21T08:02:33+5:302017-02-21T13:32:33+5:30

सामाजिक संस्था दिव्यज फाऊंडेशनच्या साथीने  समाज प्रबोधनकारासाठी अमृता फडणवीस रॅम्पवॉक करणार आहेत. मुंबईत ५ मार्च रोजी दिव्यज फाऊंडेशन आयोजित ...

Amrita Fadnavis to give confidence to those who overcome acid attacks through Ramwalk | अमृता फडणवीस रॅम्व वॉकच्या माध्यमातून अ‍ॅसिड हल्ल्यावर मात करणाºयांना देणार आत्मविश्वास

अमृता फडणवीस रॅम्व वॉकच्या माध्यमातून अ‍ॅसिड हल्ल्यावर मात करणाºयांना देणार आत्मविश्वास

माजिक संस्था दिव्यज फाऊंडेशनच्या साथीने  समाज प्रबोधनकारासाठी अमृता फडणवीस रॅम्पवॉक करणार आहेत. मुंबईत ५ मार्च रोजी दिव्यज फाऊंडेशन आयोजित या कार्यक्रमात अ‍ॅसिड हल्ल्यावर मात करत ताठ मानेने आपले आयुष्य जगणाºयांना आत्मविश्वास देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यापूर्वीदेखील रॅम्पवॉकच्या माध्यमातून जनजागृती व्हावी या उद्देश्याने अमृता फडणवीस यांनी स्त्री शिक्षणासाठीच्या मुद्याचे समर्थन करत न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक केला होता. 
 
       आता, या कार्यक्रमाविषयी अमृता फडणवीस सांगतात, हल्लीच महाराष्ट्र राज्य महिला परिषदेच्या प्रमुखांनी या अ‍ॅसिड हल्ल्याचा सामना केलेल्या लोकांशी माझी भेट घडवली आणि त्यांची प्रबळ इच्छाशक्ती पाहून मी आश्चर्यचकित झाले. त्यांचा निर्धार पाहून त्यांना अ‍ॅसिड हल्ल्याचे बळी न म्हणता त्यांनी या हल्ल्याशी चार हात करत त्याला मात दिली असेच म्हणावे लागेल. शारीरिक आणि मानसिक छळ सहन करूनही त्यांच्यातील उमेद आज जागी आहे. या मुलींमध्ये दोन मुलेही आहेत. या अ‍ॅसिड हल्ल्यावर मात करणाºयांना त्यांच्या आत्मविश्वासात भर घालण्यासाठीचा हा प्रयत्न असणार आहे. तसेच कित्येक लोकांकडून अ‍ॅसिड हल्ल्याचा सामना करणाºया व्यक्तीकडे दुर्लक्ष केले जाते. याचे खूपच वाईट वाटते. म्हणूनच यांच्या मदतीसाठी पहिले पाऊल म्हणून हा स्टेज त्यांना उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
   
        या व्यक्तींमध्ये सगळ्यात लहान मुलगी माझी मुलगी दिविजा हिच्या वयाची म्हणजेच ७ वर्षांची असल्याचे म्हणताना त्यांचे डोळे पाणावले होते. अवघ्या दुसºया वर्षी हा क्रूर हल्ला सहन करणाºया या मुलीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. तर आपली मुलगी दिविजाही तिच्यासोबत रॅम्पवॉक करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दिव्यज फाऊंडेशन आयोजित या कार्यक्रमात काही उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी, सेलिब्रिटीजदेखील रॅम्पवॉक करणार आहेत. 

Web Title: Amrita Fadnavis to give confidence to those who overcome acid attacks through Ramwalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.