n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">आक्रोश, अर्धसत्य यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शक गोविंद निहलानी एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, अमृता सुभाष अशी या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटात अमृता एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाविषयी अमृता सांगते, गोविंद निहलानींसारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. तसेच या चित्रपटात सुबोध, सोनालीसारखे अतिशय चांगले कलाकार असल्याने काम करण्यास खूपच मजा आली. या चित्रपटात मी एका झुंजार पत्रकाराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे सगळे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले.