अमजद अली खान, आशा भोसले, अनुपम खेर दिग्गजांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 13:14 IST2018-04-17T07:32:39+5:302018-04-17T13:14:32+5:30

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे म्हणजे मंगेशकर कुटुंबाने गेल्या २९ वर्षांपूर्वी स्थापन केलेली एक नोंदणीकृत सार्वजनिक चॅरीटेबल ट्रस्ट ...

Amjad Ali Khan, Asha Bhosale, Anupam Kher, Master Deenanath Mangeshkar Award for the year! | अमजद अली खान, आशा भोसले, अनुपम खेर दिग्गजांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित !

अमजद अली खान, आशा भोसले, अनुपम खेर दिग्गजांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार घोषित !

स्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे म्हणजे मंगेशकर कुटुंबाने गेल्या २९ वर्षांपूर्वी स्थापन केलेली एक नोंदणीकृत सार्वजनिक चॅरीटेबल ट्रस्ट आहे. या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २४ एप्रिल या दिवशी संगीत, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, पत्रकारिता आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. १९८८ सालापासून म्हणजेच गेल्या 75 वर्षांपासून मंगेशकर परिवार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची जयंती सार्वजनिक रित्या साजरी करत आले आहेत. या वर्षीमास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2018 या सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असणार आहेत.या वर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर २०१८ हा पुरस्कार सरोद वादक 'उस्ताद अमजद अली खान' यांना देण्यात येणार असून, मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्काराने आशा भोसले यांना गौरविण्यात येणार आहे. अनुपम खेर यांना त्यांच्या भारतीय थिएटर आणि चित्रपटातील कामगिरीबद्दल, शेखर सेन यांना त्यांच्या थिएटरमधील योगदानाबद्दल आणि  धनंजय दातार यांना त्यांच्या सामाजिक उद्योजकतेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे साहित्यिक कवी योगेश गौर यांना वाग्विलासिनी पुरस्कार तर राजीव खांडेकर यांना त्यांच्या पत्रकारितेबद्दल श्रीराम गोगटे पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून अनन्या या नाटकाला मोहन वाघ पुरस्कार बहाल करून गौरविण्यात येणार असून सेंट्रल सोसायटी ऑफ एजुकेशनच्या अध्यक्षा माननीय मेरी बेल्लीहोंजी यांना बधिरांसाठीच्या त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि सामान्य लोकांमधीलबधिरांच्या प्रगतीसाठी करत असलेल्या कामगिरीबद्दल आशा भोसले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे."मास्टर दीनानाथजींच्या स्मरणार्थ गायक, संगीतकार आणि स्टेज कलाकार म्हणून ज्यांचे भव्य योगदान महाराष्ट्र आणि भारतातील लोकांना प्रेरणादायी ठरले आहे, अशांना मंगेशकर घराण्याने मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जनतेचे आपल्याला लाभलेले इतके प्रेम आणि पाठिंबा पाहून आम्हाला आनंद होत आहे."

हा पुरस्कार सोहोळा पार पडल्यानंतर शास्रीय संगीतावर आधारित 'स्वर नृत्य भाव दर्शन' या कार्यक्रमांतर्गत पंडित बिरजू महाराज आणि सास्वती सेन कथ्थक नृत्याविष्कार सादर करतील. पंडित अजय चक्रवर्ती ठुमरीचे वेगवेगळे प्रकार सादर करणार असून, त्यांना तबल्यावर साथ करणार आहेत अनिंदो चॅटर्जी. त्याचप्रमाणे अनिंदो चॅटर्जी यांचा तबला वादनाचा सोलो परफॉर्मन्स, पंडित अजय चक्रवर्ती यांच्या ठुमरी आणि पंडित बिरजू महाराजांच्या भावविष्काराने रंगणार आहे. हृदयेश आर्ट्स तर्फे हा संगीत मैफिलीचा कार्यक्रम आयोजित केला जात असून मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 76 व्या पुण्यतिथीनिमित्त मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान व हृदयेश आर्ट्सद्वारे या सोहोळ्याचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. 

Web Title: Amjad Ali Khan, Asha Bhosale, Anupam Kher, Master Deenanath Mangeshkar Award for the year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.