अमितराजची प्रेक्षकांसाठी खास पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 11:38 IST2016-11-19T11:38:20+5:302016-11-19T11:38:20+5:30
पार्टी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे कोणताही आनंदाचा क्षण पार्टीशिवाय साजरा केला जात नाही. अशीच एक पार्टी गायक अमितराज हा प्रेक्षकांना देणार आहे.

अमितराजची प्रेक्षकांसाठी खास पार्टी
ार्टी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे कोणताही आनंदाचा क्षण पार्टीशिवाय साजरा केला जात नाही. अशीच एक पार्टी गायक अमितराज हा प्रेक्षकांना देणार आहे. त्यांने प्रेक्षकांसाठी खास पार्टी दे या गाण्याला आवाज देवून प्रेक्षकांना एक प्रकारची पार्टीच दिली आहे. हे गाणे फुगे या चित्रपटातील आहे. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित फुगे या चित्रपटाची चर्चा जोर धरू लागली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठी कलाकारदेखील उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची केमिस्ट्री फुगे या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्यांची ही केमिस्ट्री घरातील सगळ्याच लोकांना पटते असे नाही. एकूण या चित्रपटाची कथा काय आहे हे प्रेक्षकांना ट्रेलरमधून पाहिले आहे. तसेच या चित्रपटाच्या ट्रेलरसह या चित्रपटाची गाणी पण प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.नुकतेच फुगे या गाण्यानंतर आता पार्टी दे हे गाणं नुकतंच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड लाइक्स मिळताना दिसत आहे. पार्टी दे या गाण्याने सोशल मीडियावर कल्ला केलेले दिसत आहे. हे गाण्याला गायक अमितराजने आवाज दिला आहे. तसेच या गाण्याला संगीतदेखील त्यांनीच दिले आहे. त्यामुळे पार्टी दे हे गाणेदेखील झक्कास झाले आहे. तसेच या गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले आहेत. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत अश्विन आंचन, अर्जुनसिंग बर्हान, कार्तिक निशानदार आणि अनुराधा जोशी यांनी फुगे चित्रपटाची निर्मिती केली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.