Jaggu Ani Juliet : अमेय वाघ-वैदेही परशुरामीच्या ‘जग्गू आणि जुलिएट’मधील 'भावी आमदार' गाणं आऊट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 13:57 IST2023-01-31T13:52:19+5:302023-01-31T13:57:01+5:30
‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटातील एक आकर्षक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Jaggu Ani Juliet : अमेय वाघ-वैदेही परशुरामीच्या ‘जग्गू आणि जुलिएट’मधील 'भावी आमदार' गाणं आऊट!
पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटात अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी हे मुख्य भूमिकेत आहेत. टीझर आणि ट्रेलरनंतर प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटातील एक आकर्षक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अजय-अतुल यांचं सांगीत या चित्रपटाला असल्यानं प्रेक्षक यातील गाण्यांच्या प्रतिक्षेत होते, आणि आता भावी आमदार हे गाणं रिलीज झालं आहे.
भावी आमदार या गाण्यात संजय नार्वेकर आणि अमेय वाघ यांचा भन्नाट डान्स आणि केमिस्ट्री पाहायला मिळतोय. हे गाणं रिलीज झाल्यानंतर सिनेमाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटात अमेय वाघ हा वर्सोव्यामधील एका आग्री-कोळी मुलाची अर्थात जग्गूची भूमिका साकारत आहे. तर वैदेही ही ज्युली नावाच्या उच्चशिक्षीत मुलगी दाखवण्यात आली आहे.तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.
‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित होत आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ १० फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे.