अकिरामध्ये सोनाक्षीसोबत दिसणार 'हा' चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 10:52 IST2016-11-17T15:57:59+5:302016-11-18T10:52:27+5:30

        अभिनेते नंदू माधव यांनी अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. हरिशचंद्राची फॅक्ट्री हा त्यांचा चित्रपटतर ...

Akira will see 'ha' face with Sonakshi | अकिरामध्ये सोनाक्षीसोबत दिसणार 'हा' चेहरा

अकिरामध्ये सोनाक्षीसोबत दिसणार 'हा' चेहरा

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">        अभिनेते नंदू माधव यांनी अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. हरिशचंद्राची फॅक्ट्री हा त्यांचा चित्रपटतर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. स्कूल या हिंदी चित्रपटातदेखील नंदू आपल्याला दिसले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला आहे. सोनाक्षी सिन्हाच्या आगामी अकीरा या चित्रपटामध्ये नंदू माधव आपल्याला एका महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अकिरा या चित्रपटात दबंग गर्ल सोनाक्षी आणि नंदू यांची चांगलीच जोडी जमली आहे. आता तुम्हाला वाटेल कि सोनाक्षीच्या अपोझिट नंदू आपल्याला दिसणार आहेत का? तर तसे बिलकुलच नाहीये. या चित्रपटात ते आपल्याला पोलीस इन्सपेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे सोनाक्षीसोबत त्यांचे अनेक अ‍ॅक्शन सीन्स देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सोनाक्षी सध्या अ‍ॅक्शन गर्ल म्हणून देखील बॉलिवूडमध्ये ओळखली जाऊ लागली आहे. आता या चित्रपटात देखील ती नंदू यांच्या सोबत चार हात करताना दिसणार अहे. सोनाक्षी कोणताही सीन करण्याआधी माझ्याशी चर्चा करायची आणि मगच आम्ही तो सीन पूर्ण करायचो असे नंदू यांनी सांगितले आहे. तिच्यासाबेत काम करताना कधीच तिने स्टारडम दाखविले नाही. एवढेच काय तर आमचे ट्युनिंग देखील छान जमले होते असे नंदू सांगतात. दिग्दर्शक ए.आर मुरगदास यांनी नंदुजींच्या काही क्लिप्स पाहिल्या आणि लगेचच त्यांनी त्यांची या चित्रपटासाठी कास्टींग केल्याचे समजतेय. 
 

Web Title: Akira will see 'ha' face with Sonakshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.