अजय नाईक यांचा नवा चित्रपट हॉस्टेल डेज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2017 12:08 PM2017-05-12T12:08:41+5:302017-05-12T17:38:41+5:30

अजय नाईक यांनी बावरे प्रेम हे, लग्न पहावे करून, सतरंगी रे यांसारख्या चित्रपटांचे लेखन केले आहे. ते आता एक ...

Ajay Naik's new movie hostel day | अजय नाईक यांचा नवा चित्रपट हॉस्टेल डेज

अजय नाईक यांचा नवा चित्रपट हॉस्टेल डेज

googlenewsNext
य नाईक यांनी बावरे प्रेम हे, लग्न पहावे करून, सतरंगी रे यांसारख्या चित्रपटांचे लेखन केले आहे. ते आता एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणत असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हे त्यांचेच आहे. तसेच या चित्रपटाची निर्मितीदेखील तेच करणार आहेत. 
अजय नाईक यांचा नुकताच वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव हॉस्टेल डेज असे असून या चित्रपटाचे पोस्टरदेखील त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. या पोस्टरमध्ये अतिशय आनंदित असलेली मुले-मुली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सोबतच आयुष्यातले सगळ्यात मस्त क्षण अशी या चित्रपटाची टॅगलाइन आपल्याला या चित्रपटाच्या पोस्टरवर पाहायला मिळत आहे.
या पोस्टरसोबत अजय नाईक यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी आणि माझी टीम मिळून एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहे. हा चित्रपट तुम्ही मिस करू नये असे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. या चित्रपटाचे नाव हॉस्टेल डेज असून या चित्रपटाद्वारे आपण 90च्या दशकात जाऊन काही जुन्या आठवणींमध्ये रमणार आहोत. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला काळ या चित्रपटामुळे तुम्हाला पुन्हा आठवणार आहे यात काही शंका नाही. या चित्रपटातील गाणी खूप छान असून या चित्रपटासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला हवा आहे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाचे मी चित्रीकरण करायला सुरुवात करत आहे. 
या चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार आहेत याबाबत अजय नाईक यांनी मौन राखणेच पसंत केले आहे. 

Web Title: Ajay Naik's new movie hostel day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.