आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानीपत'ला साज चढवणार अजय-अतुलचे संगीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 15:36 IST2018-05-10T07:37:03+5:302018-05-10T15:36:39+5:30
चित्रपटांचे भव्यदिव्य आणि डोळे दिपवणारे सेट्स. कथेनुसार चित्रपटाचे भव्यदिव्य सेट्स साकारत आशुतोष गोवारीकर यांनी आपलं वेगळेपण कायम ठेवलं. लगान, ...

आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानीपत'ला साज चढवणार अजय-अतुलचे संगीत
च त्रपटांचे भव्यदिव्य आणि डोळे दिपवणारे सेट्स. कथेनुसार चित्रपटाचे भव्यदिव्य सेट्स साकारत आशुतोष गोवारीकर यांनी आपलं वेगळेपण कायम ठेवलं. लगान, जोधा अकबर, मोहेन्जेदडो असे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले चित्रपट आशुतोष गोवारीकरने आजवर रसिकांच्या भेटीला आणले आहेत. भव्यदिव्य सेट्सप्रमाणे चित्रपटाचे संगीत हेदेखील त्यांच्या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आशुतोष गोवारिकर यांचा आगामी ऐतिहासिक चित्रपट पानीपत हा देखील इतर चित्रपटांप्रमाण वेगळा असेल यात काही वाद नाही. आतापर्यंतच्या अनेक चित्रपटात आशुतोष गोवारीकर यांचे दिग्दर्शन आणि ए.आर.रहमान यांचे संगीत असे जणू समीकरणच होते. आशुतोष गोवारीकर यांच्या सगळ्यांचं चित्रपटांना ए.आर.रहमान यांनीच संगीत दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून गोवारीकर राहमान यांच्या चेन्नईमधल्या स्टुडिओमध्ये अनेक वेळा दिसले होते मात्र आता काही वेगळीच बातमी समोर आली आहे म्हणजे या पानीपतला संगीत रहमान नाही तर नॅशनल अॅवॉर्ड विजेते अजय-अतुल यांची जोडी देणार आहे.
गोवारीकर म्हणतात 'अजय- अतुलचे संगीत जेवढे उथळ आणि खडबडीत असते तेवढेच अर्थपूर्ण आणि मनात घर करणारे असते. त्या दोघांना संगीतातील बारीक बारीक गोष्टींची जाण आहे. कुठे आणि केव्हा कसले संगीत चांगले वाटले यांची त्यांना जाण आहे आणि ह्या चित्रपटासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे म्हणूनच आम्ही त्या दोघांची निवड पानीपतसाठी करत आहोत.
व्हिजन वर्ल्ड कंपनी हा चित्रपट करत असून रोहित शेलतकर या चित्रपटाचा सहनिर्माता आहे. त्याला या बद्दल विचारले असता तो म्हणाला की, '' मी अजय-अतुलला आमच्या टीममध्ये सामील करण्यास फार उत्सुक आहे. ते दोघे ही संगीतातले दिग्गज आहेत. त्यांच्याकडे असलेले ज्ञान हे एक गॉड गिफ्ट आहेत, ते दोघे ही मराठीचा अभिमान आहेत आणि अशा संगीतकारांकडून पानीपत सारख्या महत्त्वपूर्ण चित्रपटाचे संगीत करून घेणे म्हणजेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.''
अजय आणि अतुल यांची जोडी मराठी चित्रपटांना दिलेल्या संगीतामुळे प्रकाशझोतात आली. सैराट या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. पनीपतबाबत बोलताना अजय-अतुल म्हणाले की, ''आमच्यासाठी महान दिग्दर्शक आशू सर यांच्यासोबत काम करणे हा आमचा सन्मानच आहे. ते केवळ उत्कृष्ट दिग्दर्शक नाही तर त्यांना उत्कृष्ट संगीत संवेदनाही आहे. पानिपतला संगीत देण्यासाठी आम्ही उत्साही आहोत.''
संजय दत्त, अर्जुन कपूर आणि कृती सॅनन हे महत्त्वाचे भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहेत. पानीपतच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरु झाले आहे. हा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट आहे. यात पानीपतचे तिसरे युद्ध दाखवले जाणार आहे. पनीपत या चित्रपटाला भव्यदिव्य करण्यासाठी आशुतोष गोवारीकर कोणतीही कसर सोडणार नसल्याचे बोललं जात आहे. त्यासाठीच आशुतोष शनिवारवाड्याचा भव्यदिव्य असा सेट उभारणार आहेत. हुबेहूब शनिवारवाडा साकारण्याची जबाबदारी त्यांनी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर सोपवली आहे. पानीपतच्या रणांगणावर तीन ऐतिहासिक लढाया झाल्या. या तिन्ही लढाया ऐतिहासिक ठरल्या. शनिवारवाडा हा पेशव्यांच्या साम्राज्याचा बालेकिल्ला होता. त्यामुळे तो भव्यदिव्य असावा असा आशुतोष गोवारीकर यांचा प्रयत्न आहे. पानीपतच्या रणांगणावर तीन ऐतिहासिक लढाया झाल्या. या तिन्ही लढाया ऐतिहासिक ठरल्या. आशुतोष गोवारीकर 6 डिसेंबर 2019 रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.