​‘& जरा हटके’ चे आॅफिशिल पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 20:48 IST2016-04-10T03:48:40+5:302016-04-09T20:48:40+5:30

सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव फिल्म्स् आणि एरॉर एन्टरटेन्मेन्ट प्रस्तुत  ‘& जरा हटके’ सिनेमा लवकरच २२ जुलैला सिनेमा घरात झळकतोय. ...

Aishwaryas' poster display of 'A little more' | ​‘& जरा हटके’ चे आॅफिशिल पोस्टर प्रदर्शित

​‘& जरा हटके’ चे आॅफिशिल पोस्टर प्रदर्शित

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव फिल्म्स् आणि एरॉर एन्टरटेन्मेन्ट प्रस्तुत  ‘& जरा हटके’ सिनेमा लवकरच २२ जुलैला सिनेमा घरात झळकतोय. नुकतेच या सिनेमाचे आॅफिशल पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

प्रकाश कुंटे दिग्दर्शित या सिनेमाच्या नावाप्रमाणेच जरा हटके ट्रेलर नुकताच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. बंगाली आणि नात्याभोवती सिनेमाची कथा गुंफण्यात आली. मध्यमवयात पुन्हा विवाह करण्यासारखा धाडसी निर्णय हे जोडपं घेत आहे. मग त्याचं हे नातं त्यांच्या पहिल्या लग्नापासूनची मुलं स्विकारतात हे आपल्याला रंजक पद्धतीने या सिनेमात अनुभवता येणार आहे. बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता या सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण करतोय. इंद्रनील आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहेत.
 
इंद्रनील आणि मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत सिद्धार्थ मेनन, शिवानी रंगोले, स्पृहा जोशी, सोनाली खरे आदी कलाकारसुद्धा सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत. सिनेमाचा टिझर बाहेर आल्यानंतर सर्वांना आता हा सिनेमा कधी प्रदर्शित होईल याची उत्सुकता आहे.   

Web Title: Aishwaryas' poster display of 'A little more'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.