"ही चाल तुरू तुरू..." गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी बनवला रील, अदा पाहून चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:30 IST2025-06-05T12:29:46+5:302025-06-05T12:30:31+5:30

ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. ट्रेंडिंग गाण्यावर त्या रील बनवताना दिसतात. त्यांच्या रील्स व्हिडिओला चाहत्यांची पसंतीदेखील मिळते. आतादेखील ऐश्वर्या यांनी ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवला आहे. 

aishwarya narkar made reel video on hi chal turu turu marathi song | "ही चाल तुरू तुरू..." गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी बनवला रील, अदा पाहून चाहते झाले फिदा

"ही चाल तुरू तुरू..." गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी बनवला रील, अदा पाहून चाहते झाले फिदा

ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. गेली कित्येक वर्ष त्या प्रेक्षकांचं अभिनंदन करत आहेत. त्यांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरही त्या प्रचंड सक्रिय असतात. ट्रेंडिंग गाण्यावर त्या रील बनवताना दिसतात. त्यांच्या रील्स व्हिडिओला चाहत्यांची पसंतीदेखील मिळते. आतादेखील ऐश्वर्या यांनी ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवला आहे. 

सोशल मीडिया आणि इन्स्टाग्रामवर गाण्यांचा ट्रेंड रोज बदलत असतो. सध्या अभिजीत सावंतने गायलेल्या "ही चाल तुरू तुरू..." गाण्याचं नविन व्हर्जन सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी रील व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांच्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत. त्यांच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 


ऐश्वर्या या त्यांचे पती आणि अभिनेते अविनाश नारकर यांच्यासोबतही सोशल मीडियावर अनेक रील व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या रील्सला चाहत्यांची पसंती मिळते. रीलमध्ये ऐश्वर्या आणि अविनाश यांची एनर्जी ही तरुणांनाही लाजवेल अशी असते. त्यांचे रील व्हिडिओ व्हायरल होतात. 

Web Title: aishwarya narkar made reel video on hi chal turu turu marathi song