मराठी कलाकारांचा एअरपोर्ट सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 13:27 IST2017-02-25T07:57:04+5:302017-02-25T13:27:04+5:30

सध्या प्रत्येक व्यक्तीसाठी सेल्फी हा अत्यंत जिव्हाळ््याचा विषय असतो. जेथे जाऊ तिथे सेल्फी काढू हा जणू काही जगण्याचा नित्यनियमच ...

Airport Selfie of Marathi Artists | मराठी कलाकारांचा एअरपोर्ट सेल्फी

मराठी कलाकारांचा एअरपोर्ट सेल्फी

्या प्रत्येक व्यक्तीसाठी सेल्फी हा अत्यंत जिव्हाळ््याचा विषय असतो. जेथे जाऊ तिथे सेल्फी काढू हा जणू काही जगण्याचा नित्यनियमच बनला आहे. त्यामुळे लहानांपासून ते मोठयांपर्यत सर्वामध्ये सेल्फीची क्रेझ निर्माण झाली आहे. यामध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकारसुद्धा मागे राहिले नाहीत. बॉलिवुड असो या मराठी कलाकार प्रत्येकजण सेल्फीच्या प्रेमात पडलेला आहे. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांची लाडकी गायिका बेला शिंदे हिनेदेखील नुकताच एक झक्कास सेल्फी सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्यांचा हा सेल्फी शारजा एअरफोर्ट येथील आहे. हा सुंदर सेल्फी अभिनेता अभिजीत खांडकेकर याने क्लिक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. या सेल्फीमध्ये नेहा पेंडसे, बेला शेंडे, आदर्श शिंदे, श्रुती मराठी, पुष्कर श्रोत्री या कलाकारांचा समावेश आहे. त्याचबरोबर दुबई कॉलिंग म्हणत तिने पोस्टदेखील अपडेट केली आहे. त्यांच्या या सेल्फीला सोशलमीडियावर प्रचंड लाइक्स मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर कमेंन्टदेखील मोठया प्रमाणात मिळाल्या आहेत. त्यांच्या या लांबच्या पल्ल्यासाठी त्यांना शुभेच्छादेखील देण्यात आल्या आहेत. हे सर्व कलाकार एका शोसाठी दुबईला पोहोचले असल्याचे कळत आहे.
       
    गायिका बेला शेंडे हिने हे सर्व फोटोज दुबई डायरीज् म्हणून अपलोड केले आहेत. यामध्ये या कलाकारांचे सुंदर क्लिक पाहायला मिळत आहे. सध्या त्यांचे हे फोटो सोशलमीडियावर व्हायरल झाले आहेत. बेला हिने नेहमीच आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहेत. त्याचबरोबर मराठीसहित तिने बॉलिवुडमध्येदेखील आपल्या आवाजाचा करिश्मा दाखविला आहे. तिने उत्तरायण, नटरंग, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या आवाजाची जादू निर्माण केली आहे. त्याचबरोबर जोधा अकबर, तेरा मेरा साथ है, बेशरम या चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातूनदेखील तिने आपले स्थान बॉलिवुडमध्ये निर्माण केले आहे. 

Web Title: Airport Selfie of Marathi Artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.