'अहो..मि. खरेरा..' असं म्हणत मानसी नाईकने नवऱ्याकडे केली ही मागणी, पोस्ट आली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 20:08 IST2022-01-07T20:08:35+5:302022-01-07T20:08:58+5:30
मानसी नाईक (Manasi Naik) हिची इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

'अहो..मि. खरेरा..' असं म्हणत मानसी नाईकने नवऱ्याकडे केली ही मागणी, पोस्ट आली चर्चेत
बघतोय रिक्षावाला म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. मानसी भलेही अभिनय क्षेत्रात फारशी सक्रीय नसली तरीदेखील ती सातत्याने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती सोशल पोस्टमुळे चर्चेत येत असते. आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये चक्क नवऱ्याकडे एक मागणी केली आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
मानसी नाईक हिने इंस्टाग्रामवर नवरा प्रदीप खरेरा सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, अहो..! मि. खरेरा. १९ जानेवारी जवळ येते. पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट काय देशील. तुझी लाडो राणी एक्सायटेड आहे. मानसी नाईकच्या पोस्टवरून लक्षात येत आहे की लवकरच तिच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होणार आहे. मानसी आणि प्रदीप नेहमीच एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात.
मानसी नाईक मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीं आहे. 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तिचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या' हे गाणे हिट ठरले होते.