'धर्मवीर'च्या तुफान यशानंतर आता 'धर्मवीर २', उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 10:03 AM2023-08-09T10:03:39+5:302023-08-09T10:04:19+5:30

Dharmaveer 2 : 'धर्मवीर'च्या या दमदार यशानंतर जेजुरीमधल्या खंडोबाचे दर्शन घेऊन 'धर्मवीर २'ची घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी केली.

After the stormy success of 'Dharmaveer', now 'Dharmaveer 2' will unfold 'Saheb's Hindutva story...' | 'धर्मवीर'च्या तुफान यशानंतर आता 'धर्मवीर २', उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...'

'धर्मवीर'च्या तुफान यशानंतर आता 'धर्मवीर २', उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...'

googlenewsNext

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. धर्मवीरच्या या दमदार यशानंतर जेजुरीमधल्या खंडोबाचे दर्शन घेऊन 'धर्मवीर २'(Dharmaveer 2)ची घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी केली. 

धर्मवीरच्या यशानंतर 'धर्मवीर २'ची चर्चा सुरू झाली होती. अखेर ही चर्चा केवळ चर्चा न राहता आता प्रत्यक्षात उतरण्यास सज्ज झाली आहे. साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे मंगेश देसाई या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मंगेश देसाई यांनीच धर्मवीर चित्रपटीचीही निर्मिती केली होती. धर्मवीर चित्रपटाच्या यशात उत्तम स्टारकास्टसह लेखन, दिग्दर्शनही महत्त्वाचे ठरले होते. या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवरही आपले नाव कोरले होते. प्रवीण तरडेच धर्मवीर २चे  लेखन, दिग्दर्शन करणार आहेत. 

मंगेश देसाईने धर्मवीर २चे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा आता प्रत्यक्षात उतारणार....सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादने 'धर्मवीर २' ची आज मी अधिकृत घोषणा करत आहे. "धर्मवीर २' मधून उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...'.

धर्मवीर २च्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर 'धर्मवीर २' "साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..." अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात कलाकार कोण असणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र धर्मवीर २च्या घोषणेमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: After the stormy success of 'Dharmaveer', now 'Dharmaveer 2' will unfold 'Saheb's Hindutva story...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.