'पुष्पा'नंतर श्रेयस तळपदेनं आणखी एक 'बाजी' मारली; चाहत्यांना दिली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 19:15 IST2022-02-09T19:14:58+5:302022-02-09T19:15:19+5:30
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) गेल्या काही दिवसांपासून 'पुष्पा' (Pushpa Movie) या हिंदी सिनेमाला दिलेल्या आवाज दिल्यामुळे बराच चर्चेत आला आहे.

'पुष्पा'नंतर श्रेयस तळपदेनं आणखी एक 'बाजी' मारली; चाहत्यांना दिली हिंट
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा’ (Pushpa Movie) या हिंदी सिनेमाला दिलेल्या आवाज दिल्यामुळे बराच चर्चेत आला आहे. श्रेयसने आजवर हिंदी तसेच मराठीमध्ये बरेच हिट सिनेमे दिले आहेत. त्यातील त्याचा एक मराठी सिनेमा खूप गाजला तो म्हणजे बाजी. नुकताच या सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत आणि यानिमित्त श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ बाजी सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा बीटीएस व्हि़डीओ आहे.
श्रेयस तळपदेने व्हिडीओ शेअर करत स्पेशल कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले की,२०१३ च्या अखेरीस आम्ही एक प्रवास सुरू केला जो आम्हाला पूर्णपणे बदलणार होता आणि एक असा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला जो आव्हानात्मक आणि महत्वकांक्षी होता. एक असा प्रवास ज्यात फक्त मेहनत आणि पॅशनच नाही तर या प्रवासासाठी घाम, रक्त, अश्रू आणि आपले सर्व काही झोकून देणार होतो. ६ फेब्रुवारी २०१५, आमचं पहिलं पाऊल टाकल्याच्या १८ महिन्यांनंतर बाजी सिनेमा सर्वांच्या भेटीला आला. एक असा सिनेमा जो आपल्या सर्वांच्या मनाला भावायला लावतो आणि ज्याच्या आठवणी आपल्याला आयुष्यभर सोबत राहतील. आम्हाला सर्वांनाच बाजी सिनेमावर अभिमान आहे. बाजीला ७ वर्षे पूर्ण झाली. सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद... बाजी २ बद्दल तुम्हाला काय वाटतं? असं कॅप्शन देत श्रेयसने त्याच्या चाहत्यांना बाजी २ सिनेमाची हिंट दिली आहे.
श्रेयस तळपदे सध्या झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत पाहायला मिळतो आहे. या मालिकेत त्याने यशची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला खूप पसंती मिळते आहे.