मी सुद्धा काही व्हर्जिन नाही...! नेहा पेंडसे भडकली, पतीचा असा केला बचाव !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 12:51 IST2020-01-09T12:50:32+5:302020-01-09T12:51:43+5:30
लग्नानंतर एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत खुद्द नेहाने तिच्या पतीबद्दल गौप्यस्फोट केलेत आणि सगळ्यांनाच धक्का बसला.

मी सुद्धा काही व्हर्जिन नाही...! नेहा पेंडसे भडकली, पतीचा असा केला बचाव !!
बिग बॉसमध्ये दिसलेली अभिनेत्री नेहा पेंडसे गत 5 जानेवारीला लग्नबेडीत अडकली. उद्योगपती शार्दुल सिंग बयास याच्यासोबत नेहाने मराठमोळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले. साहजिकच नेहाचा पती शार्दुल सिंग नक्की आहे तरी कोणी याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना होती. लग्नानंतर एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत खुद्द नेहाने तिच्या पतीबद्दल गौप्यस्फोट केलेत आणि सगळ्यांनाच धक्का बसला.
होय, तिचा नवºयाचे हे तिसरे लग्न असून तो 2 मुलींचा बाप असल्याचा धक्कादायक खुलासा नेहाने यावेळी केला. यानंतर काय तर नेहा प्रचंड ट्रोल झाली. नेहाने पैशांसाठी लग्न केले, असे काय काय ट्रोलर्सनी तिला सुनावले आणि नेहाचा पारा चढला. आता नेहाने या ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले आहे.
लग्न मोडले हे आजच्या काळात नवीन नाही. करिअर बनवण्याच्या नादात त्याची दोन्ही लग्न मोडली, ही फार काही मोठी गोष्ट नाही. शादुर्लचा दोनदा घटस्फोट झाला असेल; पण मी सुद्धा काही व्हर्जिन नाही. दोनदा संसार मोडल्यानंतर त्याने माझ्याशी लग्न केलेय. याला हिंमत लागते. खरे तर यासाठी त्याचे कौतुक व्हायला हवे. आम्ही दोघांनीही एकमेकांच्या भूतकाळासह एकमेकांचा स्वीकार केला आहे, असे नेहा म्हणाली.
शादुर्लचे पहिले लग्न 10 वर्षांआधी मोडले. यानंतर पाच वर्षांआधी त्याचे दुसरे लग्नही तुटले. लग्न टिकली नाहीत पण शार्दुल एक चांगला पिता आहे. आपल्या मुलांवर तो प्रचंड प्रेम करतो, असेही नेहा म्हणाली.
शाार्दुलला भेटण्याआधी माझे 2-3 रिलेशिप झाले. मात्र ती नाती फार काळ टिकू शकली नाहीत. त्यानंतर मला शार्दुल भेटला. त्याच्या बद्दल सुरुवातीपासून सर्व माहित असूनही मी त्याच्यासोबत लग्न केले याचा मला आनंद आहे, असेही ती म्हणाली.
नेहाने मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले.