ती सध्या काय करते नंतर ​रांजण हा प्रेमकथेवर आधारित चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2017 11:25 IST2017-01-18T10:58:37+5:302017-01-18T11:25:43+5:30

प्रेमाद्वारे एक सामाजिक संदेश मांडणारा रांजण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील ‘लागीर झालं रं’ या ...

After doing what she is doing now, Ranjha will meet the audience based on the love story | ती सध्या काय करते नंतर ​रांजण हा प्रेमकथेवर आधारित चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ती सध्या काय करते नंतर ​रांजण हा प्रेमकथेवर आधारित चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

रेमाद्वारे एक सामाजिक संदेश मांडणारा रांजण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील ‘लागीर झालं रं’ या गाण्याला सोशल मीडियातून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. यश आणि गौरी असे दोन नवे चेहरे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीला मिळालेले आहेत. 
ती सध्या काय करते हा प्रेमकथेवर आधारित चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. या चित्रपटानंतर प्रेमकथेवर आधारित रांजण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात एक शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही प्रेमकथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडणार आहे. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या चित्रपटात दाखवला जाणार आहे. 
'लागीर झालं रं' या गाण्याला सोशल मीडियात सध्या खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. वैभव जोशीने लिहिलेल्या गाण्याला नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. अजय गोगावलेने त्यांच्या खास शैलीत हे गाणं गायलं आहे. 
'रांजण’ या चित्रपटात शाळेत फुलणारी एक हळूवार प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र ही प्रेमकथा इतर चित्रपटात दाखवल्या गेलेल्या टिपिकल प्रेमकथेसारखी नाहीये. प्रेमाच्या पलीकडे जाऊन केलेला सामाजिक विचार या चित्रपटात मांडलेला आहे. 
'लागीर झालं रं'च्या मेकिंगचा व्हिडिओ आणि गाण्याला अल्पावधित मिळालेला प्रतिसाद पाहून प्रेक्षक या वेगळ्या कथानकाचं नक्कीच कौतुक करतील,' असं लेखक दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितले.

Web Title: After doing what she is doing now, Ranjha will meet the audience based on the love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.