तालीम चित्रपटाचा संगीत सोहळा संपन्न करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 14:03 IST2016-06-28T08:33:25+5:302016-06-28T14:03:25+5:30
नितीन रोकडे दिग्दर्शित तालिम हा चित्रपट १५ जुलैला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा संगीच सोहळा नुकताच दिग्दर्शक डेव्हिड धवन ...

तालीम चित्रपटाचा संगीत सोहळा संपन्न करणार
ितीन रोकडे दिग्दर्शित तालिम हा चित्रपट १५ जुलैला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा संगीच सोहळा नुकताच दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी या चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. चित्रपटाच्या नावाप्रमाणे आणि कथेप्रमाणे या चित्रपटातील गाणी पण नक्कीच प्रेक्षकांना आवडणारी असतील.आजपर्यंत भवंडर, चष्मेबद्दूर, पार्टनर, मुझसे शादी करोगी, कमबख्त इश्क,देसी बॉईज,हिम्मतवाला, हम किसीसे कम नहीं, मैं तेरा हिरो यांसारख्या बॉलिवूडपटांचे यशस्वी संकलन करणारे नितीन मधुकर रोकडे आता तालिम या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.तालिम या आगामी मराठी चित्रपटात विष्णू जोशीलकर वस्तादची भूमिका साकारत आहेत. विष्णू जोशीलकर यांच्यासह अभिजीत श्वेतचंद्र, वैशाली दाभाडे, मिताली जगताप, छाया कदम, अनिकेत गायकवाड, प्रशांत मोहिते, यशपाल सारनाथ, विद्या सावले यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच या चित्रपटात एकूण ५ गीतांचा समावेश असून सध्याचा आघाडीचा गीतकार मंदार चोळकर याने ही गीते लिहिली असून संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर यांनी या गीतांना संगीत दिले आहे. तालीम रंगू दे... हे शीर्षक गीत आदर्श शिंदे आणि तरन्नुम मलिक यांनी गायलं आहे. इश्काचा बाण सुटला... ही धडाकेबाज लावणी रोंकणी गुप्ता आणि स्वप्निल गोडबोले यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आली आहे.