अभिज्ञा भावेनंतर आता मराठमोळा अभिनेता आशुतोष कुलकर्णी अडकला लग्नबेडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 18:14 IST2021-01-11T18:14:13+5:302021-01-11T18:14:49+5:30
अभिनेता आशुतोष कुलकर्णी आणि अभिनेत्री रुचिका पाटील यांचा विवाह पुण्यामध्ये पार पडला.

अभिज्ञा भावेनंतर आता मराठमोळा अभिनेता आशुतोष कुलकर्णी अडकला लग्नबेडीत
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतीच अभिनेत्री अभिज्ञा भावे बॉयफ्रेंड मेहुल पैसोबत विवाह बंधनात अडकली आहे. त्यानंतर आता अभिनेता आशुतोष कुलकर्णी लग्नबेडीत अडकला आहे.
अभिनेता आशुतोष कुलकर्णी आणि अभिनेत्री रुचिका पाटील यांचा विवाहसोहळा ८ जानेवारी २०२१ रोजी पुण्यामध्ये मोठ्या थाटात पार पडला आहे. या लग्नसोहळ्याला धनश्री काडगावकर हिच्यासह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.
अभिनेता आशुतोषने लेक माझी लाडकी, असंभव,साथ दे तू मला, गंध फुलांचा गेला सांगून, चेकमेट या मालिका तसेच चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
आशुतोषची पत्नी देखील अभिनेत्री असून तिने ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘असे हे कन्यादान’ या मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत.
रुचिकाने इंजिनिअरिंग करत असताना २०१४ साली श्रावण क्वीन स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेत ती सेकंड रनरअप ठरली. या यशानंतर मालिकेतून तिला अभिनयाची उत्तम संधी मिळाली. अभिनयाव्यतिरिक्त रुचिकाला क्राफ्टिंग आणि पेंटिंगची विशेष आवड आहे.
अभिज्ञा भावे, आशुतोषनंतर आता आणखीन काही मराठी सेलिब्रेटी लग्न बेडीत अडकणार आहेत. अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा १९ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यानंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघेदेखील लवकरच लग्न करणार आहेत. सध्या ते केळवण एन्जॉय करताना दिसत आहेत. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत या वर्षी लग्न बेडीत अडकणार आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही.