लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:05 IST2025-09-02T18:04:34+5:302025-09-02T18:05:34+5:30
Rahul Deshpande Divorce With Neha Deshpande: गायक राहुल देशपांडे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. लग्नाच्या १७ वर्षानंतर त्याने घटस्फोट घेतला आहे.

लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
Rahul-NehaDeshpandeDivorce: राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे(Rahul Deshpande)ने त्याच्या सुरेल आवाजाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. घरातूनच गायनाचं बाळकडू मिळालेल्या राहुल देशपांडेने आजवर अनेक गाण्यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा राहुल देशपांडे सध्या चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचा घटस्फोट झाल्याचे सांगितले आहे. लग्नाच्या १७ वर्षानंतर नेहासोबत विभक्त झाला आहे.
गायक राहुल देशपांडेने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने लग्नाच्या १७ वर्षांनंतर पत्नीसोबत परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तो म्हणाला की,'' प्रिय मित्रांनो, तुमच्यापैकी प्रत्येकाने माझ्या आयुष्याच्या प्रवासात आपापल्या परीने एक महत्त्वाचा भाग निभावला आहे आणि म्हणूनच मला तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्त्वाचे अपडेट शेअर करायची आहे. तुमच्यापैकी काही जणांना मी ही बातमी आधीच सांगितली आहे.''
त्याने पुढे लिहिले की, ''१७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आणि अगणित सुंदर आठवणींनंतर, मी आणि नेहाने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही आपापले आयुष्य स्वतंत्रपणे पुढे जगत आहोत. आमचे कायदेशीर विलगीकरण सप्टेंबर २०२४ मध्ये कायदेशीररित्या पूर्ण झाले. मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर करण्यापूर्वी काही वेळ घेतला, या बदलाच्या प्रक्रियेला मी खाजगीरित्या हाताळू शकेन आणि सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. विशेषतः आमची मुलगी रेणुका हिच्या हिताची. ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि मी नेहा सोबत तिच्यासाठी अतुट प्रेम, साथ आणि स्थैर्य देण्यास कटिबद्ध आहे.''
''हा जरी आमच्या वैयक्तिक आयुष्यातील एक नवीन अध्याय असला तरी, पालक म्हणून असलेले आमचे नाते आणि एकमेकांबद्दल असलेला आदर आजही मजबूत आहे. या काळात तुम्ही दाखवलेल्या समजुतीबद्दल आणि आणि निर्णयाचा आदर कराल अशी आशा आहे. '', असे राहुल देशपांडेने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.