आदित्य सरपोतदारचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 15:01 IST2019-11-30T14:06:21+5:302019-11-30T15:01:50+5:30
या सिनेमाचे शूटिंग कोकणच्या सुंदर परिसरात केले आहे

आदित्य सरपोतदारचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
प्रसिद्ध निर्माता अजित अरोरा लवकरच उनाड ह्या मराठी चित्रपटातून लोकांच्या मनात छाप सोडणार आहे, अजित अरोराने "३७७ अब नॉर्मल" सारख्या ब्लॉकबस्टर वेब सिरीज मधून त्यांनी कन्टेन्ट हे काय आहे ते दाखविले आहे आणि फिल्म मेकिंग च्या जगामध्ये एक वेगळे स्थान बनवले आहे. लवकरच अजित अरोरा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार बरोबर "उनाड" हा चित्रपट लवकरच सादर करणार आहे.आदित्य सरपोतदार ह्यांनी "माउली", "फास्टर फेणे", "ड्रीम गर्ल", "क्लासमेट" सारखी चित्रपट बनवली आहे, जे लोकांच्या मनात ठाम जागा बनवून आहे.
अजित अरोरा म्हणाले, "मराठी चित्रपट आता अश्या मुक्कामावर आहे कि ते सर्व भारतीय आवडीने पाहतात, "सैराट" सारखे चित्रपटाने मराठी चित्रपटाचे प्रतिमा बदलून टाकली आहे आणि मला विश्वास आहे कि "उनाड" हे एक असे चित्रपट आहे कि ती परत मराठी चित्रपट उद्योगात एक वेगळे स्तर नक्कीच बनवणार, "उनाडचे" पहिले स्केड्युल आता संपले आहे आणि आम्ही लवकरच दुसऱ्या स्केड्युलची तैयारी चालू करणार आहे.
उनाडचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती अजित अरोराचे प्रोडक्शन हौस "ऑरोरा प्रोडक्शन " त्या सोबत "अर्था क्रिएशन्स" आणि "नम्रता आर्टस्" सुद्धा सहभागी आहे. चित्रपट एक नवीन व अद्वितीय कथा आहे, ज्याची शूटिंग कोकणच्या सुंदर परिसरात केले आहे आणि ह्यात आपणास ज्ञात चेहरे सुद्धा बघायला भेटणार आहे.