आदित्य देशमुख झळकणार वळणमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 16:37 IST2017-03-03T11:07:41+5:302017-03-03T16:37:41+5:30
मराठी इंडस्ट्रीमध्ये खूपच चांगले चित्रपट आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठीत खूपच चांगल्या विषयावरचे चित्रपट येत आहेत. आता जाती व्यवस्थेवर ...

आदित्य देशमुख झळकणार वळणमध्ये
म ाठी इंडस्ट्रीमध्ये खूपच चांगले चित्रपट आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठीत खूपच चांगल्या विषयावरचे चित्रपट येत आहेत. आता जाती व्यवस्थेवर भाष्य करणारा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव वळण असून या चित्रपटात दोन मित्रांची मैत्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
शुभस्य शिघ्रम या चित्रपटात झळकलेला आदित्य देशमुख लवकरच वळण या चित्रपटात झळकणार असल्याचे कळतेय. या चित्रपटात जाती व्यवस्थेवर भाष्य केले जाणार आहे. मैत्री ही कोणाशीही आणि कधीही होऊ शकते असे म्हटले जाते. पण तरीही मैत्रीला अनेकवेळा जात, आर्थिक परिस्थिती या गोष्टींमध्ये मापले जाते. याच विषयावर आधारित वळण हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून केवळ काही गाण्यांचे चित्रीकरण शिल्लक असल्याचे कळतेय. या चित्रपटात आदित्य देशमुखसोबत ऋतुराज फडकेदेखील झळकणार असून तो त्याच्या मित्राची भूमिका साकारणार आहे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव त्रिपाठी यांचे आहे. या चित्रपटात वर्षा ऊसगांवकर, मोहन जोशी अशी भली मोठी स्टारकास्ट असणार आहे.
वळण या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे मुंबईतील वज्रेश्वरी येथे झाले असून या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबर महिन्यात पूर्ण झाले आहे. या चित्रपटात लेखा चाफेकर नायिकेची भूमिका साकारणार आहे तर हृषिकेश इंगळे या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अनेकांना आपल्या जातीचा अभिमान असतो. अनेक उच्च जातीतील लोकांना खालच्या जातीतील लोकांशी संबंध ठेवायला आवडत नाही. याच वाईट गोष्टीवर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.