जीजा आणि आदिनाथने खास अंदाजात दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; गोड व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 19:48 IST2023-09-20T19:48:11+5:302023-09-20T19:48:43+5:30

अभिनेता अदिनाथ कोठारे आणि त्यांची मुलगी जिजाने गणेशोत्सवाच्या सर्वांना खास शुभेच्छा दिल्या. 

Adinath Kothare Share Daughter Jija Video Ganesh Utsav 2023 | जीजा आणि आदिनाथने खास अंदाजात दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; गोड व्हिडीओ व्हायरल

Adinath Kothare -Jija

सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. मराठी आणि बॉलिवू़ड सेलिब्रिटींनीही मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन केलं. सेलिब्रिटींनी लाडक्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेता अदिनाथ कोठारे आणि त्यांची मुलगी जिजाने गणेशोत्सवाच्या सर्वांना खास शुभेच्छा दिल्या. 

आदिनाथ सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असतो. त्याच्या विविध अंदाजातील फोटो, व्हिडीओ तो चाहत्यांसाठी शेअर करत असतो. परंतु त्याचे मुलगी जिजासोबतचे व्हिडीओ आणि फोटो सर्वाधिक लोकप्रिय आहेत.  आता आदिनाथने जीजाचा असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

आदिनाथने जीजाबरोबरचा व्हिडीओ शेअर करत लिहीलं आहे की, “जीजा आणि डॅडाकडून बाप्पाला हेल्थ टिप आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा". . या व्हिडीओत जीजा  ‘किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला, इतकं गोड खाऊ नका जपा जीवाला’ हे गाणं गाताना दिसतं आहे. आदिनाथ कोठारेच्या लेकीचा हा गोड व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. 


जीजा ही उर्मिला आणि आदिनाथ यांची मुलगी आहे. ती मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय स्टार किड आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांचं लव्ह मॅरेज आहे.  पुण्यातल्या एका कॅफेत पहिली भेट झाल्यानंतर आदिनाथने उर्मिलाला मुंबईत प्रपोज केले. दोघांनी बरेच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २० डिसेंबर २०११ रोजी दोघे लग्नबेडीत अडकले.

 

आदिनाथ कोठारे हा एक भारतीय अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे, ज्याने प्रामुख्याने मराठी चित्रपटात काम केलं आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पाणी' या मराठी चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्याचे वडील महेश कोठारे हे मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत. आदिनाथने '८३' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

Web Title: Adinath Kothare Share Daughter Jija Video Ganesh Utsav 2023