पाहा आदिनाथ आणि उर्मिलाच्या जिजाचे अभ्यंग स्नानाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 11:33 IST2018-11-07T11:31:56+5:302018-11-07T11:33:30+5:30

नुकतंच जिजाचं पहिले अभ्यंग स्नान झाले. यावेळेचा फोटो उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

Adinath Kothare and Urmila Kanitkar daughter jija's diwali picture | पाहा आदिनाथ आणि उर्मिलाच्या जिजाचे अभ्यंग स्नानाचे फोटो

पाहा आदिनाथ आणि उर्मिलाच्या जिजाचे अभ्यंग स्नानाचे फोटो

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात जानेवारीला नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिचे नाव जिजा असे त्यांनी ठेवले आहे. जीजाचे बारसे कोठारे कुटुंबियांनी धुमधडाक्यात केले होते. जीजा ही केवळ काहीच महिन्यांची असून यंदाची दिवाळी ही जिजाची पहिली दिवाळी आहे. 

उर्मिला आणि आदिनाथ त्यांच्या सोशल नेटवर्किंग साइटवर त्यांच्या या लाडक्या चिमुकलीचे फोटो नेहमीच पोस्ट करत असतात आणि त्यांचे चाहते देखील या फोटोंना भरभरून लाईक्स देत असतात. नुकताच उर्मिलाने दिवाळीच्या निमित्ताने जीजाचा एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला आहे. 

जिजाची ही पहिली दिवाळी असल्याने कोठारे कुटुंबियांसाठी ही दिवाळी खूपच खास आहे. जीजाची ही पहिली दिवाळी खास असावी याकडे त्यांचा कल आहे. नुकतंच जिजाचं पहिले अभ्यंग स्नान झाले. यावेळेचा फोटो उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत जिजाला उटणं लावल्याचे दिसून येत असून ती तिच्या बाबाच्या म्हणजेच आदिनाथच्या मांडीवर दिसत आहे. तसेच या फोटोत उर्मिलाच्या हातात आपल्याला उटणं पाहायला मिळत आहे. या फोटोला उर्मिलाने खूप छान कॅप्शनदेखील दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, पालक म्हणून आमची आणि जीजाची ही पहिली दिवाळी आहे. यासोबतच तिने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

उर्मिलाने शेअर केलेल्या या फोटोत जीजा खूपच छान दिसत असून कोठारे कुटंबाचा हा फोटो खूपच छान असल्याचे आदिनाथ आणि उर्मिला यांच्या फॅन्सने त्यांच्या प्रतिक्रियांद्वारे सांगितले आहे. 

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते. आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची जोडी खूपच आवडते. 

Web Title: Adinath Kothare and Urmila Kanitkar daughter jija's diwali picture