तब्बूमुळे रडली होती वैदेही परशुरामी; म्हणाली, 'तिने फोन केला आणि...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 10:22 AM2024-03-03T10:22:09+5:302024-03-03T10:22:36+5:30

Vaidehi parshurami: तब्बूने वैदेहीला फोन केला आणि त्यानंतर त्यांच्यात झालेल्या संभाषणामुळे वैदेही अचानक रडू लागली.

actress-tabu-called-vaidehi-parshurami-after-watching-her-performance-in-simmba | तब्बूमुळे रडली होती वैदेही परशुरामी; म्हणाली, 'तिने फोन केला आणि...'

तब्बूमुळे रडली होती वैदेही परशुरामी; म्हणाली, 'तिने फोन केला आणि...'

मराठी कलाविश्वातील गुणी आणि सालस अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी (vaidehi parshurami). उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीत स्थान मिळवणाऱ्या वैदेहीने बॉलिवूडमध्येही तिची जागा निर्माण केली आहे. रोहित शेट्टीच्या सिम्बा या सिनेमात आकृती दवे ही भूमिका साकारुन तिने तिच्या अभिनयाची दुसरी बाजू प्रेक्षकांसमोर आणली. वैदेहीच्या या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुकही करण्यात आलं. मात्र, बॉलिवूडच्या एका दिग्गज अभिनेत्रीने चक्क फोन करुन वैदेहीचं कौतुक केलं. त्यामुळे ती प्रचंड भारावून गेली. इतकंच नाही तर तिच्या डोळ्यात चक्क आनंदाश्रूही आले होते.

वैदेही सध्या 'इंडियन पोलीस फोर्स' या सीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजच्या निमित्ताने नुकताच तिने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने तिच्या सिम्बा मुव्हीविषयी भाष्य केलं. सोबतच बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीने तिच्या कामाचं कौतुक केलं असंही तिने सांगितलं.

"आतापर्यंत तुझ्या कामासाठी तुला मिळालेली सगळ्यात चांगली प्रतिक्रिया कोणती?" असा प्रश्न वैदेहीला विचारण्यात आला. यावर, तिने अभिनेत्री तब्बूने दिलेल्या प्रतिक्रियेविषयी सांगितलं

"आतापर्यंत अनेकांनी मला कामासाठी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण, या सगळ्यात माझ्या लक्षात राहिलेली एक प्रतिक्रिया होती ती म्हणजे अभिनेत्री तब्बूची. सिम्बा सिनेमा रिलीज झाल्यानंतर खास तब्बूने मला फोन केला. तिच्याशी बोलताना मी फक्त रडत होते. माझ्या डोळ्यातून फक्त पाणी येत होते कारण, तब्बूच्या कामाची मी खूप मोठी चाहती आहे. ती मला प्रचंड आवडते", असं वैदेही म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी जेव्हापासून इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून तब्बू माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. कारण, आजवर तिने जी काम केली त्या सगळ्या भूमिका मला आवडल्या. यामध्येच तिचा फोन आला आणि मी भावूक झाले. तिने माझ्या कामाचं खूप कौतुक केलं. ही इतकी मोठी गोष्ट मी आयुष्यात कधीच विसरु शकत नाही."

दरम्यान, वैदेही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. झोंबिवली,

Web Title: actress-tabu-called-vaidehi-parshurami-after-watching-her-performance-in-simmba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.