लंडनाच्या रस्त्यावर मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी केले फोटोशूट, दिसली कूल लूकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 15:15 IST2020-12-09T15:15:00+5:302020-12-09T15:15:02+5:30
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या आपला आगामी मराठी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे.

लंडनाच्या रस्त्यावर मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी केले फोटोशूट, दिसली कूल लूकमध्ये
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या आपला आगामी मराठी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. लंडनमधून फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते आहे. नुकतेच सोनालीने लंडनच्या रस्त्यावरचे तिचं नव फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोंमध्ये सोनालीने जॅकेट घातले आहे. जॅकेटमध्ये सोनालीचा लूक कूल दिसतोय. फोटोमध्ये सोनालीच्या बॅक ग्राऊंडला झाडांची पानं दिसातेय.
एका फोटोत तिच्यासोबत संतोष जुवेकरसुद्धा दिसतोय. विशेष म्हणजे विना मेकअप केलेल्या फोटोशूटमध्ये सोनाली तितकीच सुंदर दिसतेय. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या या फोटोशूटवर केलं आहे.
'थ्री चिअर्स टू' सिनेमाच्या शूटिंगसाठी सोनाली लंडनमध्ये आहे. लोकेश विजय गुप्ते यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात हेमंतसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहे.
सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती धुरळा या सिनेमात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमेय वाघ, अंकुश चौधरी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट राजकारणावर आधारीत असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या सोनाली डान्सिंग क्वीन या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे.