पतीसह तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक झाली सोनाली कुलकर्णी, म्हणाली-अखंड महाराष्ट्राची
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 16:40 IST2022-11-23T16:22:26+5:302022-11-23T16:40:11+5:30
गेल्या काही दिवसांपासून सोनाली शूटिंगमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत फिरत होती

पतीसह तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक झाली सोनाली कुलकर्णी, म्हणाली-अखंड महाराष्ट्राची
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सोनालीने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यानं ती रसिकांवर मोहिनी घातली आहे. दरम्यान, सोनालीने सुवर्ण मंदिर पासून सुरु केलेलं देवदर्शन महाराष्ट्रातील तुळजा भवानीच्या दर्शनाने पूर्ण केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोनाली शूटिंगमधून ब्रेक घेऊन कुटुंबासोबत फिरत होती. आज सोनालीने तिच्या सोशल मीडियावर तुळजा भवनीच्या दर्शनाचे फोटो शेअर केलं आहेत. आमचा दौरा सुरू झाला तो सुवर्ण मंदिर पासून आणि संपला तो येऊन माय भवानी च्या चरणाशी….आमची कुलदेवी, अखंड महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजा भवानी माता
लग्नानंतर चे पहिले कौटुंबिक दर्शन आणि गोंधळ. आई तुळजा भवानी चं लक्ष्य असूदे सगळ्या लेकरांवर, एवढीच प्रार्थना, अशी पोस्ट तिनं या फोटोसोबत लिहिली आहे.
सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं लवकरच ती व्हिक्टोरिया या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पुष्कर जोग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती छत्रपती ताराराणी यांच्या भूमिकेत झळकणार आहे.