शिवानीच्या गळ्यातील मंगळसूत्र आहे खूपच खास; आकर्षक डिझाइननं वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 03:16 PM2024-02-02T15:16:56+5:302024-02-02T15:17:10+5:30

शिवानीच्या मंगळसूत्रानं सर्वांचं लक्ष वेधलं. 

Actress Shivani Surve Got Married To Actor Ajinkya Nanaware Wedding Ceremony Mangalsutra Design Seeking Attention Photos | शिवानीच्या गळ्यातील मंगळसूत्र आहे खूपच खास; आकर्षक डिझाइननं वेधलं लक्ष

शिवानीच्या गळ्यातील मंगळसूत्र आहे खूपच खास; आकर्षक डिझाइननं वेधलं लक्ष

सध्या बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. मराठीत देखील नुकतेच एक कपल विवाह बंधनात अडकले. अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे (Shivani Surve- Ajinkya Nanaware Wedding) यांनी १ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली.  शिवानी आणि अजिंक्यच्या  लग्नापूर्वीच्या विधीचे, हळदीचे आणि लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातच शिवानीच्या मंगळसूत्रानं सर्वांचं लक्ष वेधलं. 

शिवानीनं मंगळसूत्राची डिझाइन अत्यंत सुंदर ठेवली आहे. काळे मणी आणि दोन वाट्या असं घसघशीत तिचं मंगळसूत्र आहे.  अजिंक्यनं हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं. शिवानीच्या गळ्यात असलेलं हे मंगळसूत्र सोन्याचं असून ते खूपच आकर्षक दिसत आहे. लग्नसोहळ्यासाठी शिवानीने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

शिवानी आणि अजिंक्य या दोघांनाही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या लग्नाची माहिती दिली. लग्नाचे काही फोटो शेअर करत त्यांनी 'The stars finally aligned' असे कॅप्शन त्याला दिले आहे. लग्नामध्ये शिवानी आणि अजिंक्य खूपच क्यूट दिसत होते. त्यांचा हटके लूक सर्वांना प्रचंड आवडला. अत्यंत पारंपारिक पद्धतीने या दोघांचा लग्नसोहळा पार पडला आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांसह कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिवानी-अजिंक्यची लव्हस्टोरीही खूप हटके आहे. 'तू जीवाला गुंतवावे' मालिकेच्या सेटवरच दोघांची मैत्री झाली. मालिका संपल्यानंतरही ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. पुढे दोघांमध्ये प्रेम फुललं. गेल्या ६ वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.  आता अखेर त्यांनी लग्न केलं. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अजिंक्य हा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. तर शिवानी 'वाळवी' आणि झिम्मा २' सारख्या सुपर डुपर हिट चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

Web Title: Actress Shivani Surve Got Married To Actor Ajinkya Nanaware Wedding Ceremony Mangalsutra Design Seeking Attention Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.