अभिनेत्री सई ताम्हणकरची हटके संक्रांत, रस्त्यावरील गायीला भरवले तीळाचे लाडू, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 19:10 IST2024-01-16T19:10:24+5:302024-01-16T19:10:50+5:30
टॉप अभिनेत्रींपैकी एक असणारी सई कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत जोडलेली असते.

अभिनेत्री सई ताम्हणकरची हटके संक्रांत, रस्त्यावरील गायीला भरवले तीळाचे लाडू, Video व्हायरल
अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह बॉलिवूडमध्येही आता स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या भूमिकांमुळे तसेच खासगी आयुष्यमुळे सई ताम्हणकर ही कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. मराठी चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक असणारी सई कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत जोडलेली असते. सध्या सईचा एका व्हिडीओ सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. सई ताम्हणकर देखील अनोख्या पद्धतीने हा सण साजरा करताना पाहायला मिळाली. सईने रस्त्यावर उभा असलेल्या गायीला तिळाचा लाडू भरवला. हे कृत्य पाहून सर्वत्र तिचं कौतुक होत आहे. तसेच तिने पापाराझींना देखील तिळगुळ वाटले.सईचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. चाहते तिचं कौतुक करताना थकत नाहीयेत.
सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, लवकरच ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सई अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर पाहायला मिळणार आहे. सध्या ती याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. २ फेब्रुवारीला सई व सिद्धार्थचा ‘श्रीदेव प्रसन्न’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.