"त्यांना भेटायच्या आधीच सीन होता, त्यामुळे...", अमिताभ बच्चन यांना घाबरलेली रिंकू राजगुरु; 'तो' अनुभव सांगत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:51 IST2025-12-30T12:47:18+5:302025-12-30T12:51:40+5:30
रिंकू राजगुरुने सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली-"खूप घाबरलेले..."

"त्यांना भेटायच्या आधीच सीन होता, त्यामुळे...", अमिताभ बच्चन यांना घाबरलेली रिंकू राजगुरु; 'तो' अनुभव सांगत म्हणाली...
Rinku Rajguru Share Experience :अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत.फक्त प्रेक्षकच नाहीतर तर कलाकार देखील त्यांचे चाहते आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतात. अशातच लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकु राजगुरुने बिग बींसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. सध्या रिंकू राजगुरु आशा या सिनेमामुळे चर्चेत आहे. याच निमित्ताने ती सर्वत्र मुलाखती देताना दिसते आहे.
रिंकू राजगुरुने बिग बीं सोबत 'झुंड' चित्रपटात काम केलं आहे.अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात विजय बोराडे नावाच्या स्पोर्ट्स प्रशिक्षकाच्या भूमिका साकारली आहे. नुकतीच रिंकु राजगुरुने 'आरपार'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने 'झुंड' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता. याविषयी सांगितलं आहे. तेव्हा अभिनेत्रीने म्हटलं, "खूप मस्त अनुभव होता. त्यांना भेटावं किंवा एकदा तरी बघावं असं सगळ्यांना वाटत असतं. मी तर भेटायच्या आधीच त्यांचा माझा सिनेमात एक सीन होता. आमच्यामध्ये काही बोलणं झालंच नव्हतं. डायरेक्ट सीन लावलेला होता. त्याच्यामुळे पहिल्यांदा खूप घाबरले होते. पण, ते खूप कमाल आहेत. त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येते. अशा अभिनेत्यासोबत स्क्रिनवर दिसणं ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे."
'सैराट'बद्दल काय होती बिग बींची प्रतिक्रिया...
त्यानंतर रिंकूने सांगितलं," कधी त्यांच्याबरोबर जास्त बोलणं झालं नाही. पण, ते मला ओळखत होते. नागराज दादासोबत त्यांनी काम केलंय.सैराटमध्ये काम केलेली हिच ती मुलगी हे त्यांना माहित होतं. आणि आपण अमिताभ बच्चन यांना आपण माहिती आहोत ही पण आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे." असं रिंकूने सांगितलं.