अभिनेत्री प्रिया बापट 'ती'ला करतेय मिस, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 16:46 IST2021-07-02T16:46:16+5:302021-07-02T16:46:52+5:30

प्रिया बापटचा इंस्टाग्रामवरील लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

Actress Priya Bapat is doing 'She' Miss, find out who she is? | अभिनेत्री प्रिया बापट 'ती'ला करतेय मिस, जाणून घ्या कोण आहे ती?

अभिनेत्री प्रिया बापट 'ती'ला करतेय मिस, जाणून घ्या कोण आहे ती?

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते आणि त्यांना स्वतःच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. बऱ्याचदा प्रियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच प्रियाने साडीतला एक फोटो शेअर केला आहे. मात्र यावेली तिच्या फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

प्रिया बापट हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, मी तिला मिस करते आहे. तुम्ही पण करत आहे का मिस? 


प्रिया बापटने फोटो शेअर केला आहे हा फोटो तिची लोकप्रिय ठरलेली वेबसीरिज सिटी ऑफ ड्रीम्सच्या सीझन २च्या शूटिंगदरम्यानचा आहे. प्रिया बापटचा हा फोटो अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने क्लिक केला आहे. प्रिया बापट तीला म्हणजेच सिटी ऑफ ड्रीन्समध्ये तिने साकारलेल्या पूर्णिमा गायकवाडला मिस करते आहे. 


प्रिया बापटच्या या फोटोवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटी देखील लाइक्स करत कमेंट्स करत सिटी ऑफ ड्रीम्सचा दुसरा सीझन पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 
नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रिया बापट 'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन नागेश कुकुनूर यांनी केले आहे. राजकारणावर भाष्य करणाऱ्या आणि प्रियाच्या अवतीभवती फिरणाऱ्या या वेब सीरिजमध्ये तिच्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू उलगडणार आहेत.  


याशिवाय प्रिया बापट आणि काय हवंच्या तिसऱ्या सीझनमध्ये काम करताना दिसणार आहे. या वेबसीरिजमध्ये ती उमेश कामतसोबत दिसणार आहे. तसेच ती पॉण्डिचेरी या चित्रपटातही काम करताना दिसणार आहे. 

Web Title: Actress Priya Bapat is doing 'She' Miss, find out who she is?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.