परदेशी पोहोताच प्राजक्ता माळीनं शेअर केली पोस्ट, म्हणाली- जवळपास अर्धी मराठी इंडस्ट्री....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 12:33 IST2022-09-14T12:18:34+5:302022-09-14T12:33:34+5:30

Prajakta Mali : प्राजक्ता माळी अचानक परदेशी का गेली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. अखेर तिनं पोस्ट शेअर करत याचा उलगडा केला आहे.

Actress Prajakta mali doing shooting in london | परदेशी पोहोताच प्राजक्ता माळीनं शेअर केली पोस्ट, म्हणाली- जवळपास अर्धी मराठी इंडस्ट्री....

परदेशी पोहोताच प्राजक्ता माळीनं शेअर केली पोस्ट, म्हणाली- जवळपास अर्धी मराठी इंडस्ट्री....

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ता माळी (Prajakta Mali) च्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य, दिलकश अदा आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनलीये. प्राजक्ता सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह आहे, हे नव्यानं सांगायची गरज नाही. प्राजक्ता सतत नवनव्या पोस्ट शेअर करत असते. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते आहे.  कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला काही दिवसांपूर्वीच आलायं. या कार्यक्रमातून  ब्रेक घेऊन प्राजक्ताने थेट लंडनल गाठलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्राजक्ताने लंडनमधील काही फोटो शेअर केलं आहेत. 

प्राजक्ता आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेलीय. अलीकडेच तिने संकर्षण कऱ्हाडेबरोबरचा विमानतळावरील फोटो शेअर केला होता. तेव्हा चाहत्यांना प्राजक्ता लंडनमध्ये नेमकी कशासाठी जातेय असा प्रश्न पडला होता. 

प्राजक्ताची पोस्ट
''हो शुभारंभ..हा शुभारंभ…मंगल बेला आयी.Film shoot started - #london जवळपास अर्धी मराठी industry London येऊन film shoot करून गेली. मलाही हा अनुभव घ्यायचाच होता…''

प्राजक्तासोबत या  सिनेमात कलाकारांची तगडी फौज आहे हे फोटोवरुन समोर कळतंय आहे. अभिनेता अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.
 

Web Title: Actress Prajakta mali doing shooting in london