प्रभास आणि क्रिती सनॉनच्या 'आदिपुरुष'मध्ये झळकणार 'देवमाणूस' फेम ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 18:01 IST2022-09-30T18:00:04+5:302022-09-30T18:01:25+5:30
Adipurush Movie: साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर पोस्टर रिलीज झाला आहे आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

प्रभास आणि क्रिती सनॉनच्या 'आदिपुरुष'मध्ये झळकणार 'देवमाणूस' फेम ही अभिनेत्री
साऊथचा सुपरस्टार प्रभास(Prabhas)च्या आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाचा टीझर पोस्टर रिलीज झाला आहे. साऊथ सुपरस्टार प्रभासच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सैफ अली खान आणि प्रभासचा जबरदस्त लूक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रभासच्या हातात रामाप्रमाणे धनुष्यबाण दिसत आहे. त्याचा तपस्वी वेश दिसतो. यात अभिनेत्री क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात एक मराठमोळी अभिनेत्रीही झळकणार आहे. ही अभिनेत्री कोण आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. तर ही दुसरी तिसरी कुणी नसून शिकारी आणि देवमाणूस फेम अभिनेत्री नेहा खान आहे.
आदिपुरुष चित्रपटाचा टीझर पोस्टर रिलीज झाल्यानंतर अभिनेत्री नेहा खानने इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर चाहत्यांना ती आदिपुरुषमध्ये झळकणार असल्याचे सांगितले. तिने लिहिले की, आरंभ. अयोध्या, यूपी मधील सरयू नदीच्या काठावर जादुई प्रवास सुरू करताना आमच्यात सामील व्हा! #आदिपुरुष अयोध्या. आदिपुरुषमध्ये नेहा खान कोणत्या भूमिकेत दिसणार, हे अद्याप समजू शकलेले नाही.
आदिपुरुषाच्या कथेबद्दल सांगायचे तर हा रामायणावर आधारित पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटात बाहुबली फेम प्रभास भगवान रामच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे. तर सैफ अली खान लंकापती रावणाची म्हणजेच लंकेशची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबतच क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात देवदत्त नागे यांनी हनुमानाची तर सनी सिंगने लक्ष्मणची भूमिका साकारली आहे.
नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमधल्या त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले. तसेच ती झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूसच्या दुसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळाली आहे.