Nishigandha Wad Daughter : तेच हास्य अन् हुबेहुब सौंदर्य, अभिनेत्री निशिगंधा वाड यांची लेकही आहे आईसारखीच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 10:17 AM2023-05-07T10:17:20+5:302023-05-07T10:23:58+5:30

निशिगंधा वाड या गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात काम करत असल्या तरी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहीत आहे.

actress nishigandha wad dewoolkar daughter ishwari looks as beautiful as her mother | Nishigandha Wad Daughter : तेच हास्य अन् हुबेहुब सौंदर्य, अभिनेत्री निशिगंधा वाड यांची लेकही आहे आईसारखीच सुंदर

Nishigandha Wad Daughter : तेच हास्य अन् हुबेहुब सौंदर्य, अभिनेत्री निशिगंधा वाड यांची लेकही आहे आईसारखीच सुंदर

googlenewsNext

मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड (Nishigandha Wad) यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सौंदर्याचे आजही अनेक जण चाहते आहेत. नव्वदीच्या दशकात त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये एकेकाळी त्यांची गणना केली जात असे. त्या केवळ अभिनेत्रीच नव्हे तर एक लेखिका देखील आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठीतील सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. 

निशिगंधा वाड या गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात काम करत असल्या तरी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहीत आहे. त्यांचे लग्न एका अभिनेत्यासोबत झाले असून त्यांच्या पतीने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या पतीचे नाव दीपक देऊळकर असून कृष्णा या प्रसिद्ध मालिकेत त्यांनी बलरामाची भूमिका साकारली होती. तर दोघांना ईश्वरी ही मुलगी आहे. ईश्वरी अगदी हुबेहुब आईवर गेली आहे. आईप्रमाणेच ईश्वरही दिसायला अगदी सुंदर आहे. ईश्वरीचे कुटुंबासोबतचे फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते.

निशिगंधा वाड यांनी लेक ईश्वरीच्या नावाने ‘ ईश्वरी व्हिजन’ ही निर्मिती संस्था सुरु केली. याच निर्मिती कंपनीतून त्यांनी 'श्री गुरुदेवदत्त' मालिकेची निर्मिती  केली. ईश्वरीचं शिक्षण मुंबईतच झालं आहे. तिने आईसोबत अनेकदा अवॉर्ड सोहळ्यांना हजेरी लावली आहे. यावेळी ईश्वरी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसली होती. आईप्रमाणेच ईश्वरीही अभिनयात पदार्पण करणार का याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

दुसरीकडे निशिगंधा यांनी 'शेजारी शेजारी', 'एका पेक्षा एक', 'बंधन', 'प्रतिकार' यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्या काही वर्षांपूर्वी ससुराम सिमर का, सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल या हिंदी मालिकांमध्ये देखील झळकल्या होत्या. तसेच त्यांनी 'तुमको ना भूल पाएँगे', 'दिवानगी', 'रेस ३', 'आप मुझे अच्छे लगने लगे' यांसारख्या अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

Web Title: actress nishigandha wad dewoolkar daughter ishwari looks as beautiful as her mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.