'तामिळनाडूनं महाराष्ट्राला दिलेली फोडणी....'; सई ताम्हणकरची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 01:04 PM2022-05-24T13:04:35+5:302022-05-24T13:30:51+5:30

सई ताम्हणकरच्या इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Actress marathi Sai Tamhankar's post goes viral | 'तामिळनाडूनं महाराष्ट्राला दिलेली फोडणी....'; सई ताम्हणकरची 'ती' पोस्ट चर्चेत

'तामिळनाडूनं महाराष्ट्राला दिलेली फोडणी....'; सई ताम्हणकरची 'ती' पोस्ट चर्चेत

googlenewsNext

सई ताम्हणकर (Sai tamhankar) हे नाव आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून कायम सईकडे पाहिलं जातं. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सईने मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.सईचा खूप फॅन फॉलोव्हिंग आहे आणि ती बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. दरम्यान सई ताम्हणकरच्या इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओत तिच्यासोबत ललित प्रभाकर आणि पर्ण पेठेसुद्धा दिसतायेत. सईने तिचा आगामी सिनेमा ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. तामिळनाडूने महाराष्ट्राला दिलेली फोडणी म्हणजे गौरी. Not the easiest but easily the most striking. बघता बघता माझी झाली. मला खात्री आहे तुमचीही होईल. Super excited to bring you this trailer!! असं कॅप्शन तिने या ट्रेलराला दिलं आहे.  शहरी जीवनातील मानवी नातेसंबंध, प्रेम आणि विवाह यावर भाष्य या सिनेमातून करण्यात आलं आहे.

‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘मीडियम स्पाइसी’ येत्या १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. या शोमध्ये तिच्याबरोबर प्रसाद ओक देखील परीक्षक आहे. पेटपुराण ही तिची वेबसिरिज नुकतीच रिलीज झालीय.

Web Title: Actress marathi Sai Tamhankar's post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.