मराठीतील या दिग्गज अभिनेत्याची लेक आहे अभिनेत्री क्षिती जोग, तिची आईदेखील आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 19:03 IST2022-04-13T14:20:09+5:302022-04-13T19:03:16+5:30

मराठी सिनेसृष्टी अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केलं. क्षिती जोगचे आई-वडिल दोघेही मराठी कलाविश्वातीलल प्रसिद्ध चेहरे आहेत.

Actress Kshitij Jog is the daughter of this legendary actor in Marathi cinema | मराठीतील या दिग्गज अभिनेत्याची लेक आहे अभिनेत्री क्षिती जोग, तिची आईदेखील आहे अभिनेत्री

मराठीतील या दिग्गज अभिनेत्याची लेक आहे अभिनेत्री क्षिती जोग, तिची आईदेखील आहे अभिनेत्री

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री क्षिती जोगविषयी सांगणार आहोत.

मराठी सिनेसृष्टी अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये स्टार किड्स म्हणून पदार्पण केलं. क्षिती प्रसिद्ध खालनायक अनंत जोग यांची मुलगी आहे. अनंत जोग यांनी मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही आपल्या भूमिकांनी छाप पाडली आहे. 'रावडी राठोड','नो एन्ट्री', 'शांघाय', 'दहेक', 'कच्ची सडक','सरकार', 'लाल सलाम', 'रिस्क', 'सिंघम' यांसारख्या सुपहिट सिनेमातल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या आहेत. त्यांनी अनेक हिंदी सिनेमात खलनायकाच्या भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन केले आहे. क्षितीची आई उज्वला जोग याही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

क्षिती जोग 'दामिनी' या गाजलेल्या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. 'तू तिथे मी','गंध फुलांचा गेला सांगून' मराठी मालिकेसोबतच हिंदी मालिकेतही तिच्या भूमिकांनी तिने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. 'घर की लक्ष्मी बेटिया','साराभाई vs साराभाई', 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतही क्षिती झळकली होती. अलीकडेच ती 'झिम्मा' या सिनेमात झळकली होती. 

क्षितीने अभिनेता हेमंत ढोमेसह लग्न करत संसार थाटला आहे. दोघेही सोशल मीडियावर त्यांचे खास फोटो शेअर करत त्यांच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात.

Web Title: Actress Kshitij Jog is the daughter of this legendary actor in Marathi cinema