आई-वडिलांच्या घटस्फोट, थेरपी घेण्याची आली वेळ! 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकचा मोठा खुलासा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:04 IST2025-11-26T15:57:28+5:302025-11-26T16:04:14+5:30
लहान असताना आई-वडिलांच्या घटस्फोटांमुळे पूर्णपणे तुटलेली गिरीजा ओक, म्हणाली-"१७ वर्षांची असताना थेरपी घेतली…"

आई-वडिलांच्या घटस्फोट, थेरपी घेण्याची आली वेळ! 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकचा मोठा खुलासा, म्हणाली...
Girija Oak: गिरिजा ओक हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला काही नवं नाही.गेली अनेक वर्ष ती या क्षेत्रात सक्रिय आहे. आहे आणि कित्येक उत्कृष्ट भूमिका तिने केल्या आहेत. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने काम केलेले आहे. लवकरच गिरीजा परफेक्ट फॅमिली या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करणारी ही सीरिज आहे. याचनिमित्ताने गिरीजाने दिलेल्या एका मुलाखतीमुळे ती चर्चेत आली आहे. या दरम्यान, तिने आपल्या आयु्ष्यातील कठीण प्रसंगाविषयी सांगितलं आहे.
गिरीजा ओक मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. गिरीजा अगदी लहान असतानाच गिरीश ओक आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झाला. त्यामुळे अभिनेत्रीला थेरपी घ्यावी लागली होती. नुकतीच गिरीजाने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत १७ व्या वर्षी तिने थेरपी घेतल्याचं सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, "मी लहान असताना माझ्या आई- वडिलांचा घटस्फोट झाला. अशा वातावरणात मी वाढले. त्यावेळी मी पहिल्यांदा थेरपी घेतली. शारिरिक दृष्ट्याच नाहीतर, माझ्यासोबत काहीतरी घडतंय असं वाटत होतं. तेव्हा सर्वात आधी मी माझ्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. त्यानंतर त्यांनी मला मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला सांगितलं.त्यावेळी मी वयाच्या १७ व्या वर्षी पहिल्यांदा थेरपी घेतली."
गिरिजा पुढे म्हणाली, "त्यानंतर मी वेगवेगळ्या मानसोपचार तज्ज्ञांना भेटले. पण, त्यावेळी जर आई-बाबा माझ्याबरोबर आले असते, तर माझ्याबरोबर त्यांना या गोष्टीचा नक्कीच फायदा झाला असता. जेव्हा एखाद्या कुटुंबात दुरावा येतो तेव्हा खूप गैरसमज होतात आणि त्यावर उपायही नसतात." असं मत अभिनेत्रीने मुलाखतीत मांडलं.
'परफेक्ट फॅमिली' हा सिनेमात शाळेतील शिक्षक या कुटुंबाला फॅमिली थेरेपी घेण्याचा सल्ला देतात. या सिनेमात गिरिजा ओकने छोट्या मुलीच्या आईची भूमिका साकारली आहे. गिरिजासोबत या सिनेमात नेहा धुपिया, मनोज पाहवा, सीमा पाहवा, कावेरी सेठ, हिरवा त्रिवेदी, गुलशन देवैया यांच्या मुख्य भूमिका आहेत. पंकज त्रिपाठींनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या २७ नोव्हेंबरला हा सिनेमा युट्यूबवर प्रदर्शित होणार आहे.