साडीतही तितकीच सुंदर दिसते अभिनेत्री गौतमी देशपांडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 07:00 IST2020-06-16T07:00:00+5:302020-06-16T07:00:00+5:30
निळ्या रंगाच्या साडीत तिच्या सौंदर्यांला चार चांद लागले आहेत

साडीतही तितकीच सुंदर दिसते अभिनेत्री गौतमी देशपांडे
अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. गौतमी इन्स्टाग्रामवर तिचा साडीतला फोटो शेअर केला आहे. यात फोटोमध्ये गौतमी खूपच सुंदर दिसते आहे. ऑरेंज आणि निळ्या रंगाच्या साडीत तिच्या सौंदर्यांला चार चांद लागले आहेत. विना मेकअप लूकमध्ये गौतमी इतकीच सुंदर दिसते आहे. गौतमीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत. सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे.
गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. काही महिन्यांपूर्वी तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.