अभिनेत्री दीपाली सय्यदचे सिनेनिर्मितीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 16:01 IST2017-05-08T10:31:54+5:302017-05-08T16:01:54+5:30

दीपाली सय्यद ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या नृत्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. तिने मुंबईचा डबेवाला, सासू नंबरी जावई दस नंबरी, जाऊ ...

Actress Deepali Sayyed's debut production | अभिनेत्री दीपाली सय्यदचे सिनेनिर्मितीत पदार्पण

अभिनेत्री दीपाली सय्यदचे सिनेनिर्मितीत पदार्पण

पाली सय्यद ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या नृत्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. तिने मुंबईचा डबेवाला, सासू नंबरी जावई दस नंबरी, जाऊ तिथे खाऊ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनेक चित्रपट आणि गाजलेल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यद आता निर्माती झाली आहे. तिची निर्मिती असलेल्या पहिल्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच वैजापूर येथे संपन्न झाला.
ग्लोबल मीडिया कोर्पोरेशनच्या श्रेयस कामले, राजेंद्र कामले यांच्या सोबत अभिनेत्री नृत्यांगना दीपाली सय्यदने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यातच ठेवणे या चित्रपटाच्या टीमने पसंत केले आहे. अशोक कामले, सुरेंद्र वर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून लेखा त्रिलोक्य यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे तर कॅमेरामन म्हणून अरविंद सिंह हे या चित्रपटासाठी काम पाहत आहेत.
या चित्रपटात प्रेक्षकांना एक आगळी वेगळी प्रेमकथा पाहायला मिळणार असून प्रेक्षकांना पुरेपुर मनोरंजन देणारा हा चित्रपट आहे. राज, मिली आणि गौरी यांची ही एक अनवट प्रेमकथा आहे. खरं प्रेम, आयुष्य, नातेसंबंध, शहर आणि गावातलं जगणं, राजकारण यांचा वेध या चित्रपटातून घेण्यात येणार आहे. अनुपसिंग ठाकूर या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा मराठी चित्रपटात काम करणार आहे. अनुपने या पूर्वी महाभारत या मालिकेत कमांडो या हिंदी चित्रपटात आणि दक्षिणेतील काही चित्रपटात काम केले आहे. सिक्स पॅक अॅब्ज असलेला हा अभिनेता नक्कीच प्रेक्षकांवर छाप पाडेल अशी चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. त्याच्यासह गजनी फेम प्रदीप रावत, दीपाली सय्यद, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, पंकज विष्णू, अपूर्वा कवडे, दिलीप वाघ, साहेबराव पाटील यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: Actress Deepali Sayyed's debut production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.