अभिनेत्री भाग्यश्री मोटे बहिणीच्या आठवणीत झाली भावुक, म्हणाली - "जर वेळ..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 10:57 IST2023-09-28T10:56:39+5:302023-09-28T10:57:10+5:30

काही महिन्यांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या (Bhagyashree Mote) बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाला होता. बहिणीच्या अकस्मात मृत्यूनंतर तिचे कुटुंब कोलमडून गेले होते. भाग्यश्री तर अद्यापही सावरू शकलेली नाही.

Actress Bhagyashree Mote became emotional remembering her sister, said - "If time..." | अभिनेत्री भाग्यश्री मोटे बहिणीच्या आठवणीत झाली भावुक, म्हणाली - "जर वेळ..."

अभिनेत्री भाग्यश्री मोटे बहिणीच्या आठवणीत झाली भावुक, म्हणाली - "जर वेळ..."

काहीच महिन्यांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या (Bhagyashree Mote) बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाला होता. बहिणीच्या अकस्मात मृत्यूनंतर तिचे कुटुंब कोलमडून गेले होते. भाग्यश्री तर अद्यापही सावरू शकलेली नाही. दरम्यान आता ती बहिणीच्या आठवणीत भावुक झाली असून तिने स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

भाग्यश्री मोटेने इंस्टाग्रामवर बहिणीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, जर मी काळ मागे नेऊ शकले असते तर. तू मला आनंदी ठेवलेस. तू सदैव माझ्या हृद्यात राहशील. मला तुझी खूप आठवण येते. भाग्यश्रीच्या या पोस्टमुळे ती अत्यंत भावूक झाल्याचे दिसून येते.

भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेयच्या मृत्यूला अनेक दिवस उलटले तरी अद्याप तपास लागलेला नाही. भाग्यश्रीने या प्रकरणाचा आवश्यक तपास न झाल्यामुळे सीबीआयकडे हे प्रकरण सोपवावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिला दोन छोटी मुलं आहेत. सध्या भाग्यश्रीच त्यांचा सांभाळ करत आहे. तर मधू मार्कंडेयच्या पतीचं काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांची दोन्ही मुले पोरकी झाली आहेत. मात्र भाग्यश्री त्यांचा खूप चांगल्यारित्या सांभाळ करते आहे. 

वर्कफ्रंट...
मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे अभिनेत्री भाग्यश्री मोटेने सिनेसृष्टीत पदार्पण केले. लवकरच ती एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. तसेच तिने साऊथमध्येही काम केले आहे. भाग्यश्री सोशल मीडियावर सक्रीय असून ती त्यावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते.
 

Web Title: Actress Bhagyashree Mote became emotional remembering her sister, said - "If time..."