एखाद्या अभिनेत्याइतका सुंदर आहे अश्विनी भावे यांचा नवरा, पाहा त्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 13:16 IST2020-06-11T13:10:38+5:302020-06-11T13:16:18+5:30

काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या.

Actress Ashwini Bhave husband pictures | एखाद्या अभिनेत्याइतका सुंदर आहे अश्विनी भावे यांचा नवरा, पाहा त्याचे फोटो

एखाद्या अभिनेत्याइतका सुंदर आहे अश्विनी भावे यांचा नवरा, पाहा त्याचे फोटो

ठळक मुद्देअश्विनी भावे यांना आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्यांच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांचे त्यांच्या कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. मात्र अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं. त्यांनी काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केला. 

अश्विनी भावे सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करतात. पण त्यातही त्या खूप चांगल्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकतात. त्यांच्या ध्यानीमनी, मांजा या अलीकडे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अश्विनी चित्रपटांमध्ये कमी काम करत असल्या तरी त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्या त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. इतकेच नाही तर सोशल मीडियाद्वारे त्या त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात असतात. 

अश्विनी भावे यांना आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्यांच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांचे त्यांच्या कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात. त्यांचे पती तर दिसायला अतिशय सुंदर असून एखाद्या अभिनेत्याइतके ते सुंदर दिसतात.

त्यांच्या लग्नाला २३ वर्षं झाले आहेत. पण आजही अश्विनी आणि त्यांचे पती किशोर हे अगदी तरुण जोडप्याप्रमाणेच दिसतात. त्यांचे फोटो पाहिल्यानंतर त्यांची जोडी खूपच छान असल्याचे तुम्ही देखील नक्कीच म्हणाल...

अश्विनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांचे देखील फोटो आपल्याला अश्विनी यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात.

Web Title: Actress Ashwini Bhave husband pictures