अभिनेत्री आणि संवेदनशील कवयित्री स्पृहा .
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 13:39 IST2016-07-28T08:09:49+5:302016-07-28T13:39:49+5:30
अभिनेत्री स्पृहा आणि तिचा कसदार अभिनय आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु २९ जुलैला प्रदर्शित होणाºया ...

अभिनेत्री आणि संवेदनशील कवयित्री स्पृहा .
स्पृहा लहानपणापासूनच अंतर्मुख होऊन कवितेतून मोकळी होत आली आहे. तिनं आजवर अनेक कविता आणि गाणी लिहली असून ती तिच्या कविता फेसबुक आणि ट्विटर वर वेळोवेळी पोस्ट करत असते आणि तिचे असंख्य चाहते तिच्या कवितांची सतत वाट पाहत असतात. स्पृहाचा लोपामुद्रा नावाचा कविता संग्रह देखील प्रसिध्द झाला आहे . विशेष म्हणजे ती फक्त स्वत:च लिहीत नाही तर इतरांनाही लिहितं करते. शिवाय, स्पृहा नवोदित कवी लोकांना देखील लिहिण्यासाठी सतत प्रोत्साहन देत असते. थोडक्यात काय, प्रतिभासंपन्न अभिनेत्री-कवयित्री स्पृहा आता इतरांसाठीही प्रेरणास्थान झालीय हे खरं !