"स्वामी आपल्याला हवं ते देतात.."; अमृता खानविलकरने व्यक्त केल्या भावना; म्हणाली- "माझी खूप.."
By देवेंद्र जाधव | Updated: March 13, 2025 08:50 IST2025-03-13T08:48:56+5:302025-03-13T08:50:20+5:30
स्वामी समर्थांविषयी अमृताने कृतज्ञता व्यक्त करुन तिच्या भावना शेअर केल्या आहेत (amruta khanvilkar)

"स्वामी आपल्याला हवं ते देतात.."; अमृता खानविलकरने व्यक्त केल्या भावना; म्हणाली- "माझी खूप.."
अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अमृताला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'नटरंग', 'साडे माडे तीन', 'चोरीचा मामला' अशा मराठी सिनेमांमध्ये तिने काम केलंय. याशिवाय 'फूँक', 'राजी' अशा बॉलिवूड सिनेमांमध्येही अमृता झळकली आहे. अमृताने नुकतंच लोकमत सखीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या मनातील भावना शेअर केल्या आहेत.
अमृता श्री स्वामी समर्थांविषयी काय म्हणाली?
अमृताने श्री स्वामी समर्थांविषयी श्रद्धा व्यक्त करुन म्हणाली की, "मी स्वामींजवळ एवढंच मागते की, कधीही कामाची कमी नको. उत्कृष्ट पद्धतीने मी काम करु पाहतेय, त्यासाठी प्रयत्न करतेय आणि ते काम लोकांपर्यंत यायला पाहिजे. तिथून मला सर्व काही मिळतं मग ते आरोग्य असो, माझ्या इच्छा असो, जे काही मला देवाला द्यायचं ते मला तिकडून मिळतं, त्या एनर्जीमधून मिळतं."
"माझी फार मोठी लिस्ट आहे. एकतर मी स्वामींना खूप थँक यू म्हणते. मला वाटतं की कृतज्ञतेची किंवा थँक यू म्हणण्याची जी भावना आहे जी तुम्हाला खूप पुढे घेऊन जाते. म्हणजे आपण कायम मागतच राहतो. स्वामी कधीतरी आपल्याला हवं ते देतात. याशिवाय विशिष्ट माणसं किंवा परिस्थिती आपल्यासाठी योग्य नाहीये, असं जेव्हा त्यांना वाटतं ती संधी ते आपल्याला देत नाहीत. असे मी खूप अनुभव घेतले आहेत."