'शिवरायांचा छावा' सिनेमातील कलाकार कुस्तीच्या आखाड्यात भिडले; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 15:38 IST2024-02-13T15:34:49+5:302024-02-13T15:38:30+5:30
शिवरायांचा छावा सिनेमातील कलाकार कोल्हापूरच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले (Shivrayancha Chhava)

'शिवरायांचा छावा' सिनेमातील कलाकार कुस्तीच्या आखाड्यात भिडले; व्हिडिओ व्हायरल
'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. येत्या शुक्रवारी सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाची गाणी, टिझर, ट्रेलर अशा प्रत्येक गोष्टींना प्रेक्षकांची चांगली पसंत दिली आहे. 'शिवरायांचा छावा' सिनेमातील कलाकारांनाही लोकांची पसंती मिळतेय. 'शिवरायांचा छावा' सिनेमातील कलाकार सध्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अशातच हे कलाकार कोल्हापूरच्या कुस्ती आखाड्यात एकमेकांसमोर भिडले. त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.
'शिवरायांचा छावा' सिनेमातले कोल्हापूर शहरात आयोजित कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेला छत्रपती संभाजीराजे आणि शहरातील इतर मान्यवर सहभागी होते. कुस्ती स्पर्धेत सिनेमात संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा भूषण पाटील, ज्योत्याजीची भूमिका साकारणारा अभिजीत श्वेतचंद्र आणि सिनेमात विशेष भूमिकेत झळकणारा भूषण विनतरे सहभागी झाले होते. यावेळी भूषण आणि रोहन कुस्तीच्या आखाड्यात एकमेकांसमोर भिडले. दोघांमध्ये चांगलीच जुंपली. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
'शिवरायांचा छावा' सिनेमात छत्रपती संभाजीमहाराजांच्या पराक्रमाची गाथा बघायला मिळणार आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, चिन्मय मांडेलकर, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, प्रसन्न केतकर, विक्रम गायकवाड या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा १६ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. दिग्पाल लांजेकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.