‘कृतांत’ सिनेमात हा अभिनेता बनणार निसर्गप्रेमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 16:12 IST2018-02-17T10:42:34+5:302018-02-17T16:12:34+5:30

श्वास, डोंबिवली फास्ट, गैर, लेडीस स्पेशल, सानेगुरुजी, दुनियादारी यासारख्या विविध मराठी सिनेमात आणि टॅफिक सिग्नल, हजारो ख्वाईशे ऐसी, इस ...

Actor will become an actor in 'Krantant' movie! | ‘कृतांत’ सिनेमात हा अभिनेता बनणार निसर्गप्रेमी!

‘कृतांत’ सिनेमात हा अभिनेता बनणार निसर्गप्रेमी!

वास, डोंबिवली फास्ट, गैर, लेडीस स्पेशल, सानेगुरुजी, दुनियादारी यासारख्या विविध मराठी सिनेमात आणि टॅफिक सिग्नल, हजारो ख्वाईशे ऐसी, इस रात की सुबह नहीं अशा विविध हिंदी सिनेमा तसंच छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयानं छाप पाडणारा अभिनेता म्हणजे संदीप कुलकर्णी.  संदीप कुलकर्णीने आजवर साकारलेल्या विविध भूमिकांमधून रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्यामुळेच त्याचा प्रत्येक सिनेमा आणि मालिकांची रसिकांना उत्कंठा असते.नुकतेच संदीप कुलकर्णीने 'कृतांत' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे.तसेच शूटिंगवेळी अनेक निसर्गरम्य लोकेशनही आपल्या कॅमे-यात कैद केले आहे. शूटिंग दरम्याने कॅमे-यात कॅप्चर कलेले काही फोटो संदीपने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या सिनेमात संदीप कुलकर्णी साकारत असलेली ही भूमिका त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा थोडी हटके असणार आहे.या सिनेमात संदीपने सदैव निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आणि निसर्गप्रेमी ही व्यक्तीरेखा साकारली आहे.या सिनेमाबाबत आणि भूमिकेबाबत रसिकांना जितकी उत्सुकता आहे तितकेचे उत्सुक खुद्द संदीप कुलकर्णीसुद्धा आहे.'कृतांत' या शीर्षकातून सिनेमाबाबत आणि त्याच्या कथेबाबत फार काही कळणार नाही.हेच या सिनेमाचं मोठं यश असल्याचे संदीप कुलकर्णीलावाटतं.आजच्या धकाकीच्या जीवनाशी अचानक जुळून आलेला तात्त्विकतेचा संबंध असं या सिनेमाच्या कथेचे ते वर्णन करतात. या सिनेमातील व्यक्तीरेखा शब्दांत वर्णन करणं शक्य नसल्याचेही ते म्हणतात.मात्र आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही वेगळी भूमिका असेन हे सांगायलाही तो विसरला नाही.नातेसंबंध आणि आजचं जीवन हा या सिनेमाचा गाभा असून तोच याचा नायक असल्याचं संदीप कुलकर्णी सांगतात. त्यामुळे प्रत्येक रसिकाला ही भूमिका आपल्या जवळची वाटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या भूमिकेसाठी संदीप कुलकर्णीशिवाय दुस-या कोणत्याच कलाकराचा चेहरा समोर आला नाही अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे यांनी दिली आहे.संदीपशिवाय कोणताच कलाकार या भूमिकेला न्याय देऊ शकत नसल्याने संदीप कुलकर्णींची निवड झाल्याचं त्यांनी सांगितलं. संदीप कुलकर्णी यांच्यासोबत सुयोग गो-हे, विद्या करंजीकर, सायली पाटील, वैष्णवी पटवर्धन या कलाकारांच्याही कृतांतमध्ये भूमिका आहेत. विजय मिश्रा या सिनेमाचे कॅमेरामन असून दत्ताराम लोंढे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी घेतली आहे. या सिनेमाची निर्मिती निर्माते मिहीर शाह यांनी रेनरोज फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे.

Web Title: Actor will become an actor in 'Krantant' movie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.