अभिनेता वैभव तत्ववादी या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत हिंदी स्क्रीनवर पहिल्यांदाच करणार रोमांस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 16:13 IST2021-04-23T16:12:21+5:302021-04-23T16:13:50+5:30
वैभव तत्ववादी शेवटचा त्रिभंगा चित्रपटात दिसणार आहे.

अभिनेता वैभव तत्ववादी या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत हिंदी स्क्रीनवर पहिल्यांदाच करणार रोमांस
वैभव तत्त्ववादी हा मराठी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार असून तो बॉलिवूडमध्येही ओळखीचा चेहरा आहे. नुकताच तो नेटफ्लिक्सवर त्रिभंगा चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता तो आणखी एका हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अंजली पाटील दिसणार आहे. हा एक रोमँटिक चित्रपट असून या चित्रपटातून पहिल्यांदाच वैभव तत्ववादी अंजली पाटीलसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मकरंद माने आणि निर्मिती ऑटमन ब्रीज फिल्म्स करत आहे.
याबद्दल वैभव तत्ववादी म्हणाला की, हा खूप कठीण प्रवास होता. आम्ही कोरोनाच्या संकटावेळी शूटिंगला सुरूवात केली होती आणि अखेर चित्रपट पूर्ण झाला. या कोर्स दरम्यान सेटवर कोणत्याही अनुचित घटना घडल्या नाहीत ही फार आनंददायी बाब आहे. संपूर्ण चित्रपट डबिंगसह पूर्ण झाला आणि आता रिलीजची वाट पाहत आहे.
तो पुढे म्हणाला की, चित्रपटाचा विषय खूप चांगला आहे आणि हा अनुभवही खूप चांगला होता. मी हा चित्रपट पाहिला आहे आणि प्रेक्षक या चित्रपटाविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देतील याची मला खात्री आहे. ”
अभिनेत्री अंजली पाटील म्हणाली की, हा क्रेझी प्रवास होता. परंतु चित्रपट पूर्ण झाल्याचा मला आनंद आहे. हा एक अगदी नवीन काळातील सिनेमा आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना चित्रपट जवळचा वाटेल.