अभिनेता वैभव तत्त्ववादी दिसणार 'प्रोजेक्ट ९१९१'मध्ये, दिसणार या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 17:49 IST2021-03-26T17:48:47+5:302021-03-26T17:49:00+5:30
वैभव तत्त्ववादी लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता वैभव तत्त्ववादी दिसणार 'प्रोजेक्ट ९१९१'मध्ये, दिसणार या भूमिकेत
वैभव तत्त्ववादी हा मराठी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार असून तो बॉलिवूडमध्येही ओळखीचा चेहरा आहे. ओटीटीमध्येही प्रवेश केलेला वैभव लवकरच सोनीलिव्हच्या आगामी 'प्रोजेक्ट ९१९१'मध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या रूपात दिसणार आहे. अॅक्शन आणि विविध प्रकारच्या व्यक्तिरेखांनी साकारलेली 'प्रोजेक्ट ९१९१' ही अशा एका टीमची गोष्ट आहे, जी गुन्ह्यांचा शोध घेते आणि ते घडण्यापूर्वी थांबवते.
वैभव साकारत असलेली पंकज ही व्यक्तिरेखा 'प्रोजेक्ट ९१९१'च्या प्रमुख टीमच्या एका सदस्याची आहे आणि सोबत डीसीपी अमिताभ सिन्हा (सत्यजीत शर्मा) हेही दिसतील. तो एक साधा माणूस वाटत असला तरी अत्यंत बुद्धिमान, प्रॅक्टिकल आहे आणि आपल्या हजरजबाबीपणामुळे टीममध्ये तो धमाल करतो.
वैभव तत्त्ववादी पंकजच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले की, 'प्रोजेक्ट ९१९१' सारख्या शोचा भाग होताना तसेच अत्यंत बुद्धिमान कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. पंकज ही व्यक्तिरेखा मी प्रत्यक्षात जसा आहे त्यापेक्षा खूप वेगळी आहे. पण या शोने मला खऱ्या अर्थाने माझी क्षितिजे विस्तारण्याची संधी आणि एक वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारण्याची क्षमता दिली. 'प्रोजेक्ट ९१९१' हा आपण सध्या जगत असलेल्या काळासाठी अत्यंत अर्थपूर्ण शो आहे आणि प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल अशी मला आशा वाटते.
सत्यजीत शर्मा आणि वैभव तत्त्ववादी यांच्यासोबत 'प्रोजेक्ट ९१९१'मध्ये तृष्णा मुखर्जी, अभिषेक खान, मानिनी डे, जगत रावत, शरद कुमार यांच्याही व्यक्तिरेखा आहेत.