'ज्यांना मला ट्रोल करायचंय त्यांनी करा तुम्हाला...', संतोष जुवेकरची ती पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 17:39 IST2023-03-21T17:06:08+5:302023-03-21T17:39:01+5:30
संतोष जुवेकरने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे, यात त्याने ट्रोलर्सना खुलं आव्हान केलं आहे.

'ज्यांना मला ट्रोल करायचंय त्यांनी करा तुम्हाला...', संतोष जुवेकरची ती पोस्ट चर्चेत
अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर(Santosh juvekar). 'झेंडा', 'मोरया', ' रेगे' यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून संतोषने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. दमदार अभिनयामुळे चर्चेत असणार संतोष सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान त्याची सोशल मीडियावर नुकतीच शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
संतोषने सोशल मीडियावर एक रील पोस्ट केली आहे. या रिलवरुन आपल्याला ट्रोल करण्यात येणार हे जणू मान्य करत त्याने ट्रोलर्सना खुलं आव्हान केलं आहे.
संतोषने एका गाण्यावर व्हिडीओ रिल पोस्ट केलं आहे. हे रिल शेअर करताना त्याने लिहिले, खूप प्रयत्नानंतर या गाण्याचे शब्द पाठ झाले. पण या शब्दांचा अर्थ अजून कळला नाही. बहुतेक हे गाणं आपल्या मराठी गाण्यावरून घेतलं असणार " कसं काय पाहून बर हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का." ( चाल तेवढी आपल्या ओरिजनल गाण्यासारखी असती तर अजून मजा आली असती.) चला आता ज्यांना ट्रोल करायचंय त्यांनी करा तुम्हाला काम मिळालय आज
संतोषच्या या पोस्टवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकानं मस्करी करत लिहिलं आहे, जय महाराष्ट्र, आपला माणूस... संतोष दादा, कडक ना भाऊ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्यात.