विक्रम फडनीसच्या हृद्यांतरचे काम करतेय अब्बास-मस्तानची टीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 14:16 IST2017-01-23T08:46:06+5:302017-01-23T14:16:06+5:30

कोणत्याही मराठी सिनेमाचे काम बॉलिवूडमधील एखाद्या प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्याची टीम करत आहे असे आपल्याला कधीच ऐकावयास मिळत नाही. पण चित्रपटसृष्टीच्या ...

Abbas-Mastan's team working with Vikram Phadnis's heart | विक्रम फडनीसच्या हृद्यांतरचे काम करतेय अब्बास-मस्तानची टीम

विक्रम फडनीसच्या हृद्यांतरचे काम करतेय अब्बास-मस्तानची टीम

णत्याही मराठी सिनेमाचे काम बॉलिवूडमधील एखाद्या प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्याची टीम करत आहे असे आपल्याला कधीच ऐकावयास मिळत नाही. पण चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी एक गोष्ट घडली आहे. एका मराठी चित्रपटाचे काम बॉलिवूडचे क्रू मेंबर करत आहेत. 
फॅशन डिझायनर विक्रम फडनीस याची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या हृदयांतर या चित्रपटाचे सध्या जोरात चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटाचा मुहूर्त काहीच दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या मुहूर्ताला बॉलिवूडमधील शाहरुख खान, अब्बास-मस्तान, अर्जुन कपूर यांसारखे सेलिब्रिटीज उपस्थित होते. हा एक भावनिक चित्रपट असून यात मुक्ता बर्वे, सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच झलक दिखला जा, डान्स इंडिया डान्स या शोचा सूत्रसंचालक मनिष पॉलदेखील या चित्रपटात झळकणार आहे. मराठी चित्रपटात काम करण्याची मनिषची ही पहिलीच वेळ आहे. 
विक्रम फडनीसने निर्माता-दिग्दर्शन अब्बस-मस्ताच्या अनेक चित्रपटामध्ये कॉस्च्युम डिझायनरची भूमिका बजावली आहे. त्यामुळे अब्बास-मस्तान आणि विक्रम यांचे व्यवसायिक तसेच वैयक्तिक नाते खूपच चांगले आहे. त्यामुळे अब्बास-मस्तान यांची टीम सध्या हद्यांतर या चित्रपटावर काम करत आहे. अब्बास-मस्तान यांच्या टीममधील डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, असिस्टंट्स, तंत्रज्ञ सगळेच हद्यांतर चित्रपट अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी मेहतन घेत आहेत. 
अब्बास-मस्तान आणि विक्रम फडणीस यांच्यात अतिशय घट्ट नाते असल्याने हद्यांतर या चित्रपटाच्या मुहूर्ताच्यावेळीदेखील ते दोघेही शुभेच्छा देण्यासाठी जातीने हजर राहिले होते आणि आता त्यांनी त्यांची टीम विक्रमच्या मदतीसाठी दिली आहे. 
हद्यांतर या चित्रपटाची निर्मिती विक्रम फडनीस प्रॉडक्शन्स आणि यंग बैरी एंटरटेनमेंटचे प्रताप सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक यांची आहे.  

Web Title: Abbas-Mastan's team working with Vikram Phadnis's heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.