स्वप्नालीच्या हातांवर आस्तादच्या नावाची मेहंदी, पाहा फोटो  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 14:53 IST2021-02-12T14:48:58+5:302021-02-12T14:53:50+5:30

आस्ताद काळे व स्वप्नालीची लग्नघटिका समीप आली... त्याच्या प्रेमाची मेहंदी तिच्या हातावर सजली

aastad kale and Swapnalee patil to tie the knot mehendi photos viral | स्वप्नालीच्या हातांवर आस्तादच्या नावाची मेहंदी, पाहा फोटो  

स्वप्नालीच्या हातांवर आस्तादच्या नावाची मेहंदी, पाहा फोटो  

ठळक मुद्देबिग बॉस मराठीत आस्तादने त्याच्या प्रेमाची कबुली दिली, त्यावेळी स्वप्नाली तिच्या कुटुंबियांसोबत हा कार्यक्रम पाहात होती.

सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर, मानसी नाईक आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर असे अनेक मराठी सेलिब्रिटी नुकतेच लग्नबेडीत अडकले. आता मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर आस्ताद व स्वप्नाली लग्नगाठ बांधणार आहेत. तर या लग्नाचे विधी सुरु झाले आहेत. स्वप्नालीच्या हातांवर आस्तादच्या नावाची मेहंदी सजली आहे.


 

स्वप्नालीच्या मेहंदी सेरेमनीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये स्वप्नाली हिरव्या रंगाच्या आऊटफिटमध्ये आहे. गळ्यात फुलांचे सुंदर दागिने आहेत. चेह-यावर गोड हसू आहे.

मराठी बिग बॉसमधून अभिनेता आस्ताद काळे याची लव्हस्टोरी जगासमोर आली होती. अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबतच्या रिलेशनशिपची कबुली त्याने बिग बॉस मराठीमध्ये दिली होती.  

आस्ताद व स्वप्नाली अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. अनेक वर्षांपूर्वी  एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट करण्यात आला होता.
त्या कार्यक्रमात आस्ताद आणि स्वप्नाली दोघे भाऊ-बहीण होते. त्यानंतर जवळजवळ तीन-चार वर्षांनी दोघांनी पुढचे पाऊल या मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि काहीच महिन्यात आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला.

आस्तादने त्याच्या प्रेमाची कबुली बिग बॉस मराठीत दिली, त्यावेळी स्वप्नाली तिच्या कुटुंबियांसोबत हा कार्यक्रम पाहात होती. यावर तिच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती यावर स्वप्नाली बोलली होती.

तिने सांगितले होते की, ‘ मी आणि आस्ताद हे चांगले मित्रमैत्रीण असल्याचे माझ्या घरातल्यांना माहीत होते. पण मैत्रीपेक्षा आमच्यात अधिक काही आहे याची कल्पना त्यांना नव्हती. माझ्या आईला थोडासा संशय होता. पण वडिलांना काहीच माहीत नव्हते. हा भाग आम्ही घरातील सगळे मिळून पाहात होतो. हा कार्यक्रमात माझ्याविषयी बोलेल याची मला थोडीदेखील कल्पना नव्हती. त्याने कार्यक्रमात कबूल केल्यानंतर माझ्या वडिलांनी फक्त मा्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले आणि बोलव आता त्याला भेटायचे आहे, असे ते म्हणाले होते.’

Web Title: aastad kale and Swapnalee patil to tie the knot mehendi photos viral